Akshargranth
घर Ghar - युडिथ हेरमान, सुनंदा विद्यासागर महाजन
घर Ghar - युडिथ हेरमान, सुनंदा विद्यासागर महाजन
Couldn't load pickup availability
घर - युडिथ हेरमान
भाषांतर : सुनंदा विद्यासागर महाजन
(थेट जर्मनमधून मराठीत भाषांतरीत झालेली कादंबरी.)
वॉल्डन पब्लिकेशन
घर या कादंबरीत लेखिका एक मध्यमवयीन, मध्यमवर्गीय स्त्रीची गोष्ट आपलं आयुष्य सोडून नव्याच्या शोधात समुद्रकिनाऱ्यावरच्या एका लहानशा गावात येऊन राहते, अजून जुने आयुष्य पुरते सुटले नाही, आठवणीत तर ते रेंगाळत आहेच, जुनी नाती मनातून पुरती पुसली जात नाहीत. नवीन नाती तयार करताना ती सावध आहे. ती करताना आपली भावनिक गुंतवणूक कितपत होत आहे याचा अंदाज तिला बेत नाही. थोडक्यात, जुने मागे टाकले आहे आणि नवीन आयुष्य जरासे आकाराला येत आहे या टप्प्यावर ती येऊन पोचली आहे. या नवीन गावीच आपले घर आहे का? हे गाव आपल्याला आपले वाटत आहे का? शहरी-निमशहरी वातावरणाच्या ऐवजी हा समुद्राचा निकट सहवास आपल्याला झेपत आहे का ? अशा अनेक प्रश्नांसहित ती नवीन ठिकाणी जगण्यासाठी चाचपडत आहे. हेरमानच्या कथांमध्ये आढळणाऱ्या पात्रांना त्यांना मिळालेल्या सोबतीतील अपुरेपण जाणवत असते, तसेच या कादंबरीतील पात्रेही मनाने एकटी आहेत, जोडीदाराच्या, सोबतीच्या शोधात आहेत. ही पात्रे परस्परविरोधी वाटावीत अशी आयुष्य जगत आहेत, कोणी सतत खबरदारी घेऊन सावधपणे जगत आहे. तर कोणाला समुद्रावर, समुद्रात स्वत:ला झोकून द्यायचे आहे, तर कोणी समुद्रकिनारी घर करून राहायला बघत आहे, वाट्टेल तो धोका पत्करून मनासारखे जगणारे कोणी आहे, तर कोणी जन्मभर एकाच ठिकाणी राहून तेच तेच करण्यात मग्न आहे. त्या पात्रांच्या आयुष्यात कंटाळवाणी कामं आहेत, बंद पेट्या आणि पिंजरे आहेत, मोडलेली, बिघडलेली नाती, लहानपणीच्या कटू आठवणी आहेत, पण तरी ही कादंबरी काही शोकात्म नाही.
ती आपल्याला, म्हणजे मराठी वाचकाला, तेथील समाजात जगण्याच्या किती निराळ्या पद्धती असू शकतात, जगण्यात किती निराळे, आपण कल्पनाही करू शकणार नाही असे बारकावे असू शकतात याकडे लक्ष वेधते. आणि हे सांगतानाची अतिशय प्रभावशाली अशी लेखनशैली हे तर बुडिथ हेरमान यांचे खास वैशिष्ट्य. अतिशय संवेदनशीलतेने हेरमान पात्रांच्या अनुभवांमधील बारकावे पकडतात.
Share
