Akshargranth
परतवारी by सुधीर महाबळ
परतवारी by सुधीर महाबळ
Couldn't load pickup availability
Paratvari by Sudhir Mahabal
वारी आणि वारकरी माहित नाही, असा माणूस महाराष्ट्रात सापडणं विरळाच. वारी सगळ्यांनाच माहित आहे. मात्र प्रतवारी माहित असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत. वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र 'परतवारी' च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. वरील ग्लॅमर आहे, तर 'परतवारी ला ओसरून गेल्यानंतरचं वातावरण ! लेखक वरील 'ऐश्वर्यवारी, म्हणतो, तर 'परतवारी' ला 'वैराग्यवारी' सुधीर महाबळ आपल्या निवडक मित्रांसह २००५ सालापासून परतवारी करत आहोत. या 'परतवारी' मधला रोजचा ३५ कि. मी. चा पायी प्रवास करणं. ररस्त्यात कुठेही खाणं, राहणं, झोपणं... हे सगळं का करायचं ? सुखाचा जीव दुःखात का टाकायचा ? कसलं फॅड आहे हे ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तर या परतवारी' मध्ये मिळतात. कुठलीही अंधश्रद्धा घेऊन लेखक ही परतवारी करत नाही, तर या प्रवासानं अंतर्मुख होऊन स्वतःविषयी विचार करता येतो, आपण माणूस म्हणून कुठे कुठे कमी पडतो हे कळायला लागतं. भौतिक सुखसोयींना चाटवलेलं मन आणि शरीर अशा प्रवासात कसं वागतं ? आपले अहंकार आपण किती कुरवाळतो ? अशा वेळी हा प्रवाद अहंकाराची एक एक टोकं बोथड करून टाकतो. शहरीपणाचा, उच्चशिक्षणाचा, आर्थिकस्तराचा गंड गळून जातो आणि हा प्रवास वाटेतल्या प्रत्येक माणसाशी माणुसकीच नातं जोडतो. लेखकाला या प्रवासात भेटलेली माणसं. निसर्ग, छोट्याछोट्या गोष्टीतून मिळालेले नवे धडे, माणसातला स्वार्थ आणि परमार्थ.. अशा अनेक गोष्टी 'परतवारी' तून उलगडत जातात.
Share
