{"product_id":"प्र-प्रशान्त-बागड-pra-by-prashant-bagad","title":"प्र - प्रशान्त बागड Pra by Prashant Bagad","description":"\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e'अतीक्षा' या कथेतून\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eदुरून कुठूनतरी कोकिळेचा कुहू कानावर आला. तसाच, नेहमीसारखाच, नवताशून्य. परत ती कुहुशीळ ऐकू आली. परत आली. दोघं जण नकळत ऐकत होते. या कोकिळेचं काहीतरी बिनसलेलं असावं. कुहू म्हणण्यात पारंपरिक यांत्रिकता होती, खटकणारी गती होती. शहराच्या प्रत्येक भागात, प्रत्येक सोसायटीच्या आडभागात एखादी कोकिळा अशी असते. ती कायम कुहू कुहू करत असते. खोकल्यासारखी, आजारी असल्यासारखी, काहीतरी बिघडल्यासारखी ती गात असते. हा वाढत्या शहरीकरणाचा मन:स्वास्थ्यावर होणारा परिणाम असावा. वेळ असला आणि कुहू कुहू ऐकू आलं की वाटतं, या कोकिळेचा शोध घ्यावा; तिला विचारावं; तिच्यावर उपचार करावेत. तसं कुणी प्रत्यक्षात करत नाही; पण ऐकताना तसं तीव्रतेने वाटतं. या दोघांना मनोमन तसं काही वाटत होतं. आपापलं वाटणं अनुभवत ते एकेकटे होते. कोकिळा दुरून कुहूची आवर्तनं करत होती. तिचं गाऊनही नुकसानच होत असावं. कुहुकार या बिल्डिंगच्या सर्व भिंतींवर, खिडक्यांवर, ग्रिल्सवर, काचांवर, खांबांवर, लहानमोठ्या खिळ्यांवर, धुणं वाळत घालायच्या दोऱ्यांवर, गच्चीवरच्या संडासाच्या पाइपांवर आदळत होता. तो ऐकताना वाटत होतं की आपण शंभर वर्षांपूर्वी आहोत आणि तेव्हातून तेव्हापूर्वीची ही कुहुशीळ ऐकतो आहोत.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52814113112343,"sku":null,"price":313.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-20215015.png?v=1776700074","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a1-pra-by-prashant-bagad","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}