Skip to product information
1 of 1

Akshargranth

सम्राट अशोक – एक तत्त्वज्ञ राजा पॅट्रिक ऑलिवेल

सम्राट अशोक – एक तत्त्वज्ञ राजा पॅट्रिक ऑलिवेल

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Samrat Ashok by Patrick Olivelle, Savita Damale मौर्य सम्राट अशोक ही भारतीय इतिहासातील एक महान विभूती आहे.त्याच्या राज्यकाळात (इ.स.पू. २६८ ते २३२) मौर्य साम्राज्य जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेले होते. त्याने आपल्या राज्याचा कारभार अतिशय प्रभावीपणे केलाच पण त्याचबरोबर युद्धाचा त्याग केला, धर्माची संकल्पना विकसित केली, बौद्ध धर्माला पाठिंबा दिला आणि धार्मिक एकोपा वाढावा म्हणून प्रयत्न केले आणि यासाठीच तो सुप्रसिद्ध आहे.मागील कित्येक शतकांपासून मूळ अशोक कसा असावा म्हणून बऱ्याच कल्पना रचल्या गेल्या आणि त्या कल्पनांच्या आधारावर पुनर्कल्पनाही रचल्या गेल्या. असे म्हणतात की निदान दोन अशोक तरी होतेच. त्यातला एक आहे ऐतिहासिक अशोक (ज्याला आपण मुख्यत्वेकरून त्याच्या शिलालेखांमधून समजून घेतो.) आणि दुसरा आहे तो विभूती रूपातील अशोक. लोकांच्या कल्पनाशक्तीतून हा दुसरा अशोक निर्माण झाला आहे. प्रख्यात विद्वान पॅट्रिक ऑलिवेल यांच्या या नव्या पुस्तकात या सम्राटाच्याजगात, त्याच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला असला तरी ते करताना या दोन्ही अशोकचे मिश्रण करण्याचा मोह टाळला आहे. खरे तर, या मोहाला आत्तापर्यंत बरेच लेखक बळी पडलेले आहेत. मुख्यत्वेकरून शिलालेखांवर आधारित (म्हणजे ज्यात स्वतः अशोकच बोलला आहे त्यावर आधारित) असे हे पुस्तक आहे. माहितीचे स्रोत कितीही हुलकावण्या देणारे आणि तुकड्या-तुकड्यात उपलब्ध असले तरीही ऑलिवेल यांनी भारताच्या या पहिल्या महान राज्यकर्त्याचे एक मनमोहक असे व्यक्तिचित्रण अतिशय जिवंतपणे रेखाटले आहे .

पॅट्रिक ऑलिवेल | सविता दामले |

View full details