Skip to product information
1 of 1

Akshargranth

Bhaitad भैताड by Dr. Prachin Bhoyar

Bhaitad भैताड by Dr. Prachin Bhoyar

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

ती नवकथा असो लघुकथा असो की दीर्घकथा मराठी कथा हा एकमेव लोभस असा वाङ्मय प्रकार आहे. सध्या लेखनात दीर्घकथा प्रवृत्ती अधिक वाढीस लागली आहे. मात्र लघुकथा किंवा नवकथा तेवढीच टवटवीत आहे आणि तिचे आकर्षणही. लेखक-वाचक अशी दोघांचीही ती समंजस सोय आहे. म्हणजे अशी की लिहिताना लेखक सहज असतो. कमी वेळेत मनातले कागदावर येते. गुंता वाढत नाही. तिच गोष्ट वाचकांची. कमी वेळेत वाचून संपवता येते आणि आशय थेट मनात उतरतो. मेंदू शिणवण्याची गरज नसते. मुळात डॉ. प्रचिन हे नावापासूनच वेगळे आहेत. ते ईलेक्ट्रॉनिकी विषयामध्ये पीएच्डी असून सध्या बेंगलुरू शहरात एका नामांकित कंपनीत सेमीकंडक्टर चिप डिझाईन आणि संशोधन कार्य करतात. सध्या त्यांचा राबता आणि कार्याचा व्याप हा पूर्णतः नागरी असला तरी त्यांची नाळ जुळली आहे ती ग्रामीण जीवनाशी. त्यामुळे तिथली हवा, तिथले पाणी, ती भूमी, ती माणसे यावर त्यांचा पिंड पोसला गेला आहे आणि त्यांची ती गळामिठी त्यांच्या कथालेखनावर स्पष्ट दिसून येते. ते दैनंदिन जीवन, ती बोलीभाषा, तो परिवेश कथांचे गारुड बनून येत राहतो. बोली किंवा भाषा ही जरी किंचित भिन्न, अपरिचित असली तरी, किंवा तिचा लहेजा वेगळा वाटत असला तरी ती आपल्याला जवळची वाटावी अशीच आहे -- वसन्त वाहोकार

Vijay Prakashan |

View full details