{"product_id":"bharatiya-nastikatecha-magova-भारतीय-नास्तिकतेचा-मागोवा-जगदीश-काबरे","title":"Bharatiya Nastikatecha Magova भारतीय नास्तिकतेचा मागोवा | जगदीश काबरे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatiya Nastikatecha Magova by Jagdish Kabare Marathi book | Pages: 200 | \u003cbr\u003e\u003cbr\u003eमागोवा म्हणजे धांडोळा घेणे. उगम, विकास आणि प्रवास ही इतिहाससंशोधनाची पद्धती आहे. धर्म अथवा ईश्वरी कल्पना अनेकदा कथा, पुराणे, आख्यायिका आणि परंपरांच्या माध्यमातून पिढ्यान् पिढ्या सहज पुढे सरकत राहतात. परंतु नास्तिकता ही तर्क आणि चिकित्सेची परंपरा असल्याने ते तत्त्वज्ञान तितक्याच सहजतेने लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच भारतीय नास्तिकतेचा हा मागोवा नजरेखालून घातला पाहिजे. ‘नास्तिक’ हा शब्द आजही अनेकदा संशय आणि सामाजिक वैगुण्याशी जोडला जातो. ईश्वरकल्पनेला स्पष्टपणे आणि जाहीरपणे नकार देणे म्हणजे जणू भारतीय संस्कृतीपासून दुरावणे, आणि नास्तिकता ही पाश्चिमात्य विचारांची उसनी देणगी आहे, असा गैरसमज अनेकांच्या मनात दृढ आहे. हे पुस्तक त्या गैरसमजांना तर्क आणि सुलभ मांडणीने छेद देते. सांख्य, बौद्ध, जैन, आणि चार्वाक असा हा लांबरुंद प्रवास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":55291930444055,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-09-20231715.png?v=1789924268","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/bharatiya-nastikatecha-magova-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}