Akshargranth
Charvak By Suresh Dvadashivar चार्वाक
Charvak By Suresh Dvadashivar चार्वाक
Couldn't load pickup availability
Charvak By Suresh Dvadashivar चार्वाक - सुरेश द्वादशीवार
ईश्वर, धर्म, धार्मिक कर्मकांडे यांना विरोध करणारा चार्वाकांचा पंथ पांडवाच्या काळातही आदरणीय होता हे विशेष आहे. वनपर्वात द्रौपदी कृष्णाला सांगते, 'लोकायत मताचे ग्रंथ शिकवायला तिच्या वडिलांनी काही पुरोहितांची नेमणूक केली होती.' तात्पर्य, चार्वाक आदरणीय होते, त्यांचे ग्रंथ अस्तित्वात होते. ते शिकवले जात होते आणि त्यांचे पुरोहितही होते. आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले... पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही... कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
Sadhana prakashan |
Share
