{"product_id":"chindhyanchi-devi-aani-itar-katha-by-namdev-dhasal-चिंध्यांची-देवी-आणि-इतर-कथा","title":"Chindhyanchi Devi Aani Itar Katha By Namdev Dhasal चिंध्यांची देवी आणि इतर कथा","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eघनदाट जंगलासारखी. तिला तिची अंगभूत लय, रूप सगळं आहे; पण इथे नियोजनाचं, बोनसाय करणारं काटछाटीचं कौर्य नाही. जगण्याच्या सहस्रावधी अंतर्विरोधांना रिचवून आपल्या आक्राळविक्राळ आकारांनी, रंगांनी भरून गच्च घट्ट बिलगलेल्या वेली आणि परस्परांना शह-काटशह देत सूर्याकडे झेपावणाऱ्या नाना जातींच्या वृक्षांचं कोसळून तिथेच सेंद्रिय खतासारखं रापून निघालेलं अनुभवविश्व; त्यातला किर्र काळोख, लख्ख चांदणं आणि भाजून काढणारा सूर्यताप मिरवत उभं होणारं घनदाट जंगल. माणसाचं म्हणून जे जे आहे ते त्याच्यासाठी, त्याचं आहे. त्यात सगळं आलं : तराळ-अंतराळ, घाण आणि लवंड, ऊन रक्त आणि ऊन लघवी, राग अनुराग, ताप-अनुताप. नामदेव काही टाळत नाही. निवडून सांगत नाही. 'गोलपिठा' (१९७२) ते 'निर्वाणाआधीची पीडा' (२०१०) अशा त्याच्या आठ संग्रहांतल्या निवडक छप्पन्न कविता इथे एकत्र आहेत. यांत स्त्री निमित्तमात्रही आहे आणि मूळ कारणही. स्त्री-पुरुष, शिव-शक्ती किंवा त्याहीपलीकडे जाऊन नरनादी असा एक आदिबंध त्यावरल्या नागवी सभ्यतेला, दांभिक व्यवहारांच्या छेद देत सळसळत्या चैतन्यानिशी इथे अधोरेखित होताना दिसतो. इतका प्रचंड पैस सामावून घेणारी कविता माझा समकालीन नामदेव ढसाळ गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ लिहीत आहे. त्याच्या या उत्सव ऊर्जेचा हा एक अंश आपल्यापर्यंत आणताना होणारा आनंद गूढ नाही; पण अद्भुत मात्र आहे !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52422851035415,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-07132105.png?v=1772868078","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/chindhyanchi-devi-aani-itar-katha-by-namdev-dhasal-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}