Skip to product information
1 of 1

Akshargranth

Dandkarunya दंडकारूण्य

Dandkarunya दंडकारूण्य

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Dandkarunya दंडकारूण्य by Avinash Poinkar

दंडकारूण्य । अविनाश पोईनकर

अविनाश पोईनकर यांच्या कविता मानवी चेतना जागवणाऱ्या आणि आदिवासींच्या सुख-समाधानाचा ठेवा जपणाऱ्या आहेत. प्रस्थापित व्यवस्थेवर ‘वार’ करत यांच्या कविता अनेक जखमा घेऊन जगताहेत. या कवितेच्या पाना-पानांवर जखमांचा चीत्कार ऐकू येतो. आदिवासी जीवन किती भयावह आहे, याचं चित्र त्यांच्या कवितेतून स्पष्ट होतं. अशा जखमा घेऊन जगणारा हा आदिवासी या देशाचा नागरिक आहे. प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाने आपले जीवन जगण्याचा संविधानिक अधिकार आहे. तसाच तो आदिवासींनाही आहे. आदिवासींचे रक्षण आणि त्यांचा विकास करण्यासाठी एक मोठी स्पर्धा लागलेली आहे. ‘आदिवासींनी कसे जगावे आणि कसे जगू नये’ हा प्रश्न आदिवासींचा नाही, ‘जे’ आदिवासींचा कैवार घेऊन आदिवासींचे प्रश्न सोडवू पाहतात आणि विकास करू पाहतात ‘त्या’ स्पर्धकांचा आहे. ‘आम्ही’ म्हणजे आदिवासी हे स्पष्ट आहे. पण ‘तुम्ही’ म्हणजे कोण-कोण आहात? हा प्रश्नच आहे. मुख्य प्रवाहाच्या नावाने आदिवासी, अस्तित्व, अस्मिता आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्या भोगवादी मुख्य प्रवाहाला अविनाश पोईनकर या कवितेतून विरोध करताना दिसतात. विकासाच्या या निर्णयप्रक्रियेत आदिवासींचाही सहभाग असायला पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने सहकार्यावर आधारित संस्कृती जपता येईल. समता-ममता, प्रेम-विश्वासाचे जीवन जगता येईल. शोषण, दमन, वर्चस्व, विषमता आणि सामाजिक भेदभाव करणारी ही क्रूर व्यवस्था आदिवासी जीवन उद्ध्वस्त करून जीवनाचे सौंदर्य हरपणार आहे. ही भीती अविनाश पोईनकरांच्या कवितेचा गाभा आहे. जल-जंगल-जमीन संघर्षाची प्रतिनिधित्व करणारी आणि धाक बंदुकीचा। दंडकारण्यात । कोणत्या युद्धात । कोण आहे ? असा प्रश्न विचारणारी ही मराठीतील महत्त्वाची कविता आहे.

– वाहरू सोनवणे

Lokvadmay Grih Prakashan |

View full details