{"product_id":"diggaj-2-by-deepa-deshmukh-दिग्गज-2-दीपा-देशमुख","title":"Diggaj  2 by Deepa Deshmukh  दिग्गज 2 । दीपा देशमुख","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदीपा देशमुख लिखित 'दिग्गज' हे पुस्तक सर्व वयोगटातल्या वाचकांसाठी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसून जगाला नवी दिशा देणाऱ्या ६०हून अधिक असामान्य व्यक्तींच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजीवनात डोकावण्याची संधी यामुळे वाचकाला मिळणार आहे. या नभोमंडलात \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजसे अगणित तारे लुकलुकतात, त्या सगळ्यांची संख्या मोजणं अशक्य आहे; \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्याचप्रमाणे या जगात अशी काही माणसं आहेत आणि होऊन गेलीत, ज्यांचं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकार्य या तेजोमय ताऱ्यांसारखंच आहे. त्यांच्या कल्पनांनी आणि योगदानाच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रकाशानं हे जग अनेक युगं उजळून निघालं आहे. अशा या व्यक्तींनी आपल्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअद्वितीय कौशल्याने आणि समर्पित वृत्तीने इतिहासाच्या पानावर आपली अमिट \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eछाप सोडली आहे ! 'दिग्गज' या पुस्तकातून साहित्य, कला, विज्ञान, गणित, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eस्थापत्य, चित्र-शिल्पकला, संगीत, समाजकारण आणि राजकारण यांसारख्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविविध क्षेत्रांतल्या प्रतिभासंपन्न व्यक्तींच्या कार्याचा आणि जीवनाचा अद्भुत प्रवास \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवाचकाला घडणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातलं प्रत्येक पान वाचकाला या प्रेरणादायी दीपस्तंभांच्या अथक परिश्रमांची,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eध्येयाची आणि समाजासाठी काहीतरी भरीव करण्याच्या तीव्र इच्छाशक्तीची ओळख \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकरून देईल. त्यांच्या कल्पनांनी, प्रयत्नांनी आणि परिश्रमांनी हे जग कसं बदललं; \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्यांच्या शोधांनी मानवी जीवनाला एक नवी उंची कशी दिली आणि त्यांच्या कलेने \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआपल्या मनात कसा आनंद निर्माण केला; हे सारं वाचकाला 'दिग्गज'मध्ये वाचायला \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशित 'दिग्गज' भाग १ आणि भाग २ अशी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eही दोन पुस्तकं स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द मनात निर्माण \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकरणारी ठरतील आणि जीवनातल्या समस्या, अडथळे यांना सामोरं जात एक सखोल,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e व्यापक दृष्टिकोन देतील, अशी खात्री वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52543321473303,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-24222423.png?v=1774369372","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/diggaj-2-by-deepa-deshmukh-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%9c-2-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}