Akshargranth
Fakira by Anna Bhau Sathe (फकिरा)
Fakira by Anna Bhau Sathe (फकिरा)
Couldn't load pickup availability
अण्णा भाऊ साठे यांच्या 'फकिरा' या कादंबरीला मराठी साहित्यात मानाचे पान लाभले आहे. मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अण्णाभाऊंची 'फकिरा' ही कादंबरी! अण्णाभाऊ जे लिहितात ते त्यांनी भोगलेले असते. ज्यांच्याविषयी ते लिहितात ती सारी त्यांची माणसे असतात. फकिरा, राधा, विष्णुपंत इत्यादी सर्व व्यक्ती अण्णाभाऊंच्या साक्षात परिवारातल्या आहेत. तळागाळातील उपेक्षित, वंचित माणसं आणि त्यांची सुखदुःखं चित्रित करण्यात अण्णाभाऊ रंगून गेलेले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून जगण्यासाठी लढणाऱ्यांच्या शौर्यगाथा वाचायला मिळतात. ही माणसं अन्यायाविरुद्ध लढतात, सतत झुंजतात आणि प्रसंगी प्राणार्पणही करतात. त्यांची मानवी मूल्यांवरील श्रद्धा ढळत नाही. इंग्रजी सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगताना अण्णाभाऊंसारखा लोकशाहीर या उपेक्षित माणसाची तेजस्वी प्रतिमा सादर करतात. कलादृष्ट्या श्रेष्ठ ठरलेल्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन तर गौरविलेच पण फकिराचे भारतीय भाषांबरोबर रशियन, झेक, पोलिश, जर्मन या भाषांतही अनुवाद झाले आहेत. फकिरासारख्या झुंजार माणसाची कथा डॉ. आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊंनी अर्पण केली यात केवढे औचित्य आहे ! -- भालचंद्र फडके
Share
