Skip to product information
1 of 1

Akshargranth

Godakathacha Kadamb – गोदाकाठचा कदंब

Godakathacha Kadamb – गोदाकाठचा कदंब

Regular price Rs. 269.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 269.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Godakathacha Kadamb – गोदाकाठचा कदंब by Shrikant Deshmukh

या ग्रंथाचा आणखी एक महत्त्वाचा विशेष म्हणजे, लेखक ज्या ज्या भागांत सरकारी नोकरीनिमित्ताने फिरला, तिचले शेती समाजशाख, अर्थशास्त्र त्याने समजून घेण्याचा केलेला प्रथत्न, शेतकरी दुःखाचे लेखकाने केलेले आत्मसातीकरण आणि आंतरिकीकरण यांतून या लेखनाला एक प्रकारचे आगळे साहित्यिक मूल्य प्राप्त झाले आहे. लेखनातोल सहजता, प्रवाहीपण वाचकाला खिळवून ठेवणारे असेच आहे. ढोबळ गद्यप्रायता टाळून सहजपणे एखादी गोष्ट कथन करावी, असे हे लेखन, शेतीविषयीचे उत्तम ललितगद्य म्हणूनही अतिशय महत्त्वाचे आणि अपवादात्मक ठरावे, मराठी भाषेत बहुतेक कवी-लेखक, कविता-कथेत रमतात. ढोबळ ग्रामीण साहित्य लिहिणाऱ्या कवी-लेखकांची शेती आणि सामाजिक प्रश्नांविषयीची समज अतिशय तोकडी असते. त्यामुळे त्याला समाजशास्त्रीय आकलनाच्या अंगभूत मर्यादा पडतात. यातून निर्माण होणारे सुमार लेखन आपल्या भोवताली खूप आहे. श्रीकांतचे गद्य आणि पद्य लेखन त्याला नेहमीच अपवाद ठरावे, असे राहिले आहे. त्याच्यातला कवी हा शेती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शेतकरी हा कविता लिहितो आहे, ही बाब शेतीभाती, खेड्यांवर लेखन करणाऱ्यांसाठी मोलाची ठरावी, अशी आहे. या पार्श्वभूमीवर श्रीकांत देशमुख याचा हा लेखसंग्रह वाचला, तर शेकडो ‘गोपुरी’ निर्माण होतील आणि ‘कदंबाचे बन’ फुलतील, असा विश्वास वाटतो! – निशिकांत भालेराव

Vishwakarma Publication |

View full details