Skip to product information
1 of 1

Akshargranth

Gramophone Girls Bhag 1 Va Bhag 2 (Set of 2 book) - ग्रामोफोन गर्ल्स भाग १ व भाग २ (संच)

Gramophone Girls Bhag 1 Va Bhag 2 (Set of 2 book) - ग्रामोफोन गर्ल्स भाग १ व भाग २ (संच)

Regular price Rs. 799.00
Regular price Rs. 900.00 Sale price Rs. 799.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

तवायफ-

सुमारे १६व्या शतकातल्या अविभाजित हिंदुस्थानाच्या इतिहासात नोंदवल्या गेलेल्या आणि पुढे १८व्या शतकात केवळ उच्चभ्रु समाज स्तरासाठीच कला सादर करणाऱ्या सुप्रतिष्ठित आणि प्रतिभाशाली कलावंत.

समाजात मान आणि वजन असलेल्या तवायफांच्या तहजीब आणि मौसिकीचा प्रवास लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस, पटना, कलकत्ता ते मुंबई असा होत गेला.

सामाजिक बदलांमुळे ही अभिजात कलासंस्कृती हळूहळू कलंकित, उपेक्षित होऊन विस्मृतीत गेली.

परंतु १९व्या-२०व्या शतकाच्या उंबरठ्यावर ग्रामोफोन तबकडीवर ध्वनिमुद्रणासाठी उमटलेले पहिले स्वर तवायफांचेच होते.

जानकीबाई, गौहरजान, मेहबूबजान, कज्जन, मोतीबाई, असगरी, सिद्धेश्वरीदेवी अशा अनेकींनी ठुमरी-दादरा-ग़ज़ल घराघरांत पोहोचवली.

लाखेच्या तबकड्यांवर उमटलेले त्यांचे हे स्वर म्हणजे काळावरची स्वर-स्वाक्षरी!

तवायफांच्या संघर्षमय आयुष्याचा आणि शाही दरबार ते कोठा-रंगमंच-ध्वनिमुद्रिका ते चित्रपट अश्या कलाप्रवासाचा हा अल्प लेखा-जोखा...

‘ग्रामोफोन गर्ल्स’-

(भाग १ - लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस)
आणि
(भाग २ - गया-पटना, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई)

View full details