{"product_id":"gramophone-girls-bhag-1-va-bhag-2-set-of-2-book-ग्रामोफोन-गर्ल्स-भाग-१-व-भाग-२-संच","title":"Gramophone Girls Bhag 1 Va Bhag 2 (Set of 2 book) - ग्रामोफोन गर्ल्स भाग १ व भाग २ (संच)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतवायफ-\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुमारे १६व्या शतकातल्या अविभाजित हिंदुस्थानाच्या इतिहासात नोंदवल्या गेलेल्या आणि पुढे १८व्या शतकात केवळ उच्चभ्रु समाज स्तरासाठीच कला सादर करणाऱ्या सुप्रतिष्ठित आणि प्रतिभाशाली कलावंत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमाजात मान आणि वजन असलेल्या तवायफांच्या तहजीब आणि मौसिकीचा प्रवास लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस, पटना, कलकत्ता ते मुंबई असा होत गेला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक बदलांमुळे ही अभिजात कलासंस्कृती हळूहळू कलंकित, उपेक्षित होऊन विस्मृतीत गेली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरंतु १९व्या-२०व्या शतकाच्या उंबरठ्यावर ग्रामोफोन तबकडीवर ध्वनिमुद्रणासाठी उमटलेले पहिले स्वर तवायफांचेच होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजानकीबाई, गौहरजान, मेहबूबजान, कज्जन, मोतीबाई, असगरी, सिद्धेश्वरीदेवी अशा अनेकींनी ठुमरी-दादरा-ग़ज़ल घराघरांत पोहोचवली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलाखेच्या तबकड्यांवर उमटलेले त्यांचे हे स्वर म्हणजे काळावरची स्वर-स्वाक्षरी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतवायफांच्या संघर्षमय आयुष्याचा आणि शाही दरबार ते कोठा-रंगमंच-ध्वनिमुद्रिका ते चित्रपट अश्या कलाप्रवासाचा हा अल्प लेखा-जोखा...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘ग्रामोफोन गर्ल्स’-\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e(भाग १ - लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e(भाग २ - गया-पटना, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53573625282839,"sku":null,"price":799.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-25212734.png?v=1782401015","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/gramophone-girls-bhag-1-va-bhag-2-set-of-2-book-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-%e0%a4%b5-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}