{"product_id":"gulamgiri-गुलामगिरी-by-mahatma-jyotiba-phule-महात्मा-ज्योतिबा-फुले","title":"Gulamgiri गुलामगिरी By Mahatma Jyotiba Phule महात्मा ज्योतिबा फुले","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53603094561047,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-07-01211206.png?v=1782918518","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/gulamgiri-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-by-mahatma-jyotiba-phule-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}