Akshargranth
Kenjalgadcha Kabja केंजळगडचा कब्जा by Vidhyadhar Vaman Bhide Shipping free
Kenjalgadcha Kabja केंजळगडचा कब्जा by Vidhyadhar Vaman Bhide Shipping free
Couldn't load pickup availability
विद्याधर वामन भिडे यांची कादंबरी म्हटली की त्यातल्या प्रत्येक पात्राचे व्यक्तीवर्णन केल्याशिवाय कादंबरी सुरूच होत नाही. ह्या कादंबरीतील पहिल्याच 'धोंडीबा आणि कोंडीबा ' ह्या प्रकरणात त्यांच्या व्यक्तिमत्वाची वर्णने होऊनच सुरुवात झाली आहे. अशी त्यांची कादंबरी लिखाणाची खास शैली आहे यात वादच नाही. आणि त्या व्यक्ती वर्णनात वाचक गुंतून जातो आणि हळूहळू मंत्रमुग्ध होऊ लागतो. थोडक्यात ती कादंबरी त्याला 'चढू' लागते, आणि त्याच्या हातून ती खाली ठेवली जाणे त्याच्या मनाला अवघड होते. याच भावनेपोटी ह्या ग्रंथ प्रकाराला लेखन तज्ज्ञांनी 'कादंबरी' असं नामकरण केलं आहे, कारण 'कादंबरी' ह्या शब्दाचा अर्थच मुळात पिण्याची दारू,मद्य, किंवा मदिरा असा आहे.. ह्या कादंबरीच्या वाचनात वाचक जणू 'वाचनधुंद' होतो...अशी धुंदी ही कादंबरी वाचल्या शिवाय कळणार किंवा चढणार नाही....
Vidhyadhar Vaman Bhide | Varada books |
Share
