{"product_id":"kubad-ani-itar-katha-कुबड-आणि-इतर-कथा-by-khalid-javed-vikas-palve","title":"Kubad Ani Itar Katha कुबड आणि इतर कथा by Khalid Javed, Vikas Palve","description":"\u003cp\u003eKubad Ani Itar Katha कुबड आणि इतर कथा by Khalid Javed खालिद जावेद, Vikas Palve विकास पालवे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक जाणिवांनी लिहिल्या जाणाऱ्या उर्दूतील सशक्त कथापरंपरेचं विस्तारलेलं रूप खालिद जावेदसारख्या समकालातील आश्वासक कथाकाराच्या लेखनात दिसून येतं. आधुनिक काळ आणि या काळाने चहुअंगांनी ओरबाडलेला सामान्य माणूस, याकडे हा कथाकार कसा अनोख्या नजरेने पाहतो आहे हे मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने कवी व भाषांतरकार विकास पालवे यांनी खालिद जावेद यांच्या 'बुरे मौसम में' या बहुचर्चित कथासंग्रहाचं भाषांतर केलं आहे. जगण्याशी सांधा जुळवताना कोलमडून पडणारी माणसं, त्यांचे विस्कटलेले नातेसंबंध, मानसिक ताणतणाव, शारीरिक दुबळेपण, कुरूप व्यवहाराशी नाइलाजाने करावी लागणारी तडजोड, या साऱ्यांतून विवेक व संवेदनशीलतेची धुगधुगी शिल्लक असलेल्या माणसांची होणारी घुसमट आणि त्यापायी येत जाणारं एकाकीपण, निराशा वा टोकाचं वैफल्य यांविषयी या कथा बोलतात. उर्दूतील एका नव्या सशक्त कथाकाराचा परिचय मराठी वाचकांना करून देण्याबरोबरच आधुनिक जाणिवांचं आजचं भारतीय साहित्य कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, याकडेही या भाषांतराच्या निमित्ताने भाषांतरकाराने लक्ष वेधलं आहे. या त्यांच्या प्रयत्नांचं मराठी वाचक निश्चितच भरभरून स्वागत करतील, असा विश्वास बाळगायला हरकत नाही. - प्रवीण दशरथ बांदेकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52423195558167,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-03-07133817.png?v=1772869095","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/kubad-ani-itar-katha-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a4%a1-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-by-khalid-javed-vikas-palve","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}