1
/
of
1
Akshargranth
Love Jihad Ani Anya Dantkatha लव्ह जिहाद आणि दंत कथा
Love Jihad Ani Anya Dantkatha लव्ह जिहाद आणि दंत कथा
Regular price
Rs. 0.00
Regular price
Sale price
Rs. 0.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Love Jihad and other fictions | Love Jihad Ani Anya Dantkatha लव्ह जिहाद आणि दंत कथा by Shrinivas Jain, Marium alavi, Supriya Sharma, Savita Damle
लव्ह जिहाद, मुस्लिम तुष्टिकरण, जबरदस्तीने धर्मांतर हे सगळे कटकारस्थानांचे दावे सध्या भारतातील रोजच्या संभाषणांना चालना देऊ लागले आहेत. राजकारणी त्यांना खूप मोठे करून दाखवतात, माध्यमे कर्णकटू स्वरात ते आळवत राहतात आणि समाजमाध्यमांतील फॉरवर्ड्स आणि अपडेट्स यांचा अथक माराही चालूच राहतो. या सर्वांमुळे हीच खरी परिस्थिती आहे असे मोठ्या संख्येने लोकांना वाटू लागले आहे.
परंतु भारतातील बहुसंख्यांक हिंदूंना दुर्बळ करण्यासाठी येथील अल्पसंख्यांक कट कारस्थाने करत आहे हे दावे सत्यावर आधारित आहेत का? की केवळ सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध राखण्यासाठी निर्माण केलेल्या आणि सर्वत्र प्रसार केलेल्या या दंतकथा आहेत?
यातील काही दावे लाखो भारतीयांना रोजच्या रोज येणारे व्हाट्सअप चॅट्स आणि समाज माध्यमांत भरवलेली ' फीड्स' यांच्या दुनियेचा भाग आहेत. त्या दाव्यांची उलटतपासणी या पुस्तकात लेखकांनी केली आहे. पहिल्या प्रकरणात ' लव्ह जिहाद' या दाव्याची सत्यता तपासली आहे. या सर्व दाव्यांतील हाच दावा सर्वात पुढे आहे . लव्ह जिहाद' च्या पहिल्या ज्ञात प्रकरणापासून लेखकांनी सुरुवात केली असून केवळ ' लव्ह जिहाद' या नावाखाली येऊ शकतील अशाच प्रकरणांचा त्यांनी तपास केला आहे. नव्या 'लव्ह जिहाद' विरोधी कायद्याखाली ज्या राज्यात सर्वाधिक लोकांना अटक झालेली आहे त्या राज्यात लेखक गेले आणि ही कारवाई समर्थनीय आहे का ते त्यांनी तपासून पाहिलं. प्रकरण दोनमध्ये ' लोकसंख्या जिहाद' चा परामर्श घेतला आहे. या दाव्यानुसार, मुस्लिम लोक जास्त मुले जन्माला घालून लोकसंख्या जिहाद करीत आहेत. यासाठी लेखकांनी आकडेवारी गोळा केली आणि संसदीय दप्तरातून शोधले की नजीकच्या भविष्यात १८ कोटी मुस्लिम खरोखरच १०० कोटी हिंदूंना ओलांडून पुढे जायची शक्यता आहे का? तर ख्रिश्चन लोकांनी जबरदस्तीने भारतात मोठे धर्मांतर घडवून आणण्याची भयंकर योजना आखली आहे या हिंदुत्ववादी दाव्याची सत्यता तिसऱ्या प्रकरणात तपासून पाहिली आहे. अशाच प्रकारे चौथ्या प्रकरणात मुस्लिम तुष्टीकरणाचा दावा तपासून पाहिला आहे. त्यासाठी दिवाळीच्या आणि ईदच्या दिवशी अनुक्रमे किती वीज पुरवली जाते? हाज सबसिडी, मदरशांना दिला जाणारा निधी आणि मुसलमान लोक चार बायका करू शकतात हा उजव्या हिंदूंचा आवडता बागुलबुवा या सगळ्याचा लेखकांनी यात शोध घेतला आहे.
Madhushree Publication |
Share
