Akshargranth
Madhasuryachhaya मधसूर्यछाया by Ronya Othmann, Rajendra Dengale
Madhasuryachhaya मधसूर्यछाया by Ronya Othmann, Rajendra Dengale
Couldn't load pickup availability
मधसूर्यछाया - रोन्या ओथमान Die Sommer (डी झोमर) या मूळ जर्मन पुस्तकाचा थेट मराठी अनुवाद.
अनुवादक : राजेंद्र डेंगळे
असेच दिवसामागोमाग दिवस जात राहिले - आवारातल्या कोंबड्यांसारखे, निवांत, निष्काम. वेगळं असं काही घडतच नव्हतं आणि लैलापण विसरत चालली होती की, रेनजिन आण्टी व एविन आण्टी शहरातून नक्की कधी इथं भेटीला आल्या होत्या. पाच दिवसांपूर्वी की सहा? जितक्या हट्टानं काळाचं चक्र असं फिरत राहिलं, तितक्याच वेगानं लैलाला तिला गावात येऊन किती दिवस झाले याचा विसर पडू लागला आणि तितकीच ती जास्त जास्त अस्वस्थ होत राहिली. दुपारच्या जेवणाच्यावेळी किंवा नंतर बागेला पाणी देत असताना अचानक तिला वाटे की काहीतरी भयंकर घडणार आहे. तिला माहीत होऊन चुकलं होतं की असे विनाशकारी प्रसंग काही कधी पूर्व सूचना देऊन येत नाहीत. त्यांना यायचंच असेल, तर ते एकदमच येतात. जसं त्यावेळी, अनेक वर्षांपूर्वी, जेव्हा आजीचे वडील एका दुपारी एका झाडाच्या सावलीत जरा लवंडले होते व त्यांना झोप लागून गेली होती व काही माणसं अचानक आली होती व त्यांनी आजीच्या वडिलांना ठार मारलं होतं. आजी ज्याला 'फर्मान' म्हणायची ते कधीच सांगून यायचं नाही, हे लैलाला माहिती होतं. लैलाला वाटायचं की लवकरच जगबुडी येणार. एक धरणीकंप किंवा प्रलय. जसा त्या वेळी प्रलय आला होता - जीनं तिला शैखानच्या टेकडीची कथा सांगितली होती
Share
