{"product_id":"marathyanche-aarmar-1659-1818-मराठ्यांचे-आरमार-१६५९-१८१८","title":"Marathyanche Aarmar (1659-1818) - मराठ्यांचे आरमार १६५९-१८१८","description":"\u003cp\u003eडॉ अनुराधा गोविंद कुलकर्णी | Dr Anuradha Govind Kulkarni\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतातील पौर्वात्य राज्यकर्त्यांना नौकानयनाची परंपरा मुळातच कमी आणि जी थोडीबहुत होती तीही जास्त करून शांततापूर्ण व्यापारी नौकानयनाचीच अधिक. ती परंपरादेखील शिवकालाच्या शेकडो वर्षे पूर्वीच खंडित झालेली होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वाभाविकच छत्रपती शिवाजी महाराजांना शून्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. त्याकरिता नौका बांधण्याचे ज्ञान, भूगोलाचे ज्ञान, समुद्राचे, वाऱ्याचे व खगोलाचे ज्ञान, नाविक रणतंत्रांचे ज्ञान अशा विविध ज्ञानशाखांचे ज्ञान आवश्यक होते. यांपैकी एकएक ज्ञानशाखा आत्मसात करायला एक आयुष्यही पुरे पडत नाही. केवळ हे ज्ञान संपादन करून आरमार निर्माण झाले नसते. त्याकरिता नौका बांधण्याची, आरमाराचे सुरक्षित तळ म्हणून उपयोगी पडतील असे जलदुर्ग बांधण्याची आणि माणसे प्रशिक्षित करण्याची आवश्यकता होती. हे सर्व फार मोठ्या खर्चाचे काम होते. पण केवळ पैसा उपलब्ध करूनही भागण्यासारखे नव्हते. पोर्तुगिजांचा व सिद्दीचा विरोध असताना, मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना, जमिनीवरील युद्धांच्या सर्व गरजा भागवून, करायचा होता. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले; सभासदाच्या शब्दात सांगायचे तर “दर्यास पालण राजियांनी घातले. \"\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67606186426647,"sku":null,"price":1190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-09-30215757.png?v=1790783478","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/marathyanche-aarmar-1659-1818-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a5%a7%e0%a5%ac%e0%a5%ab%e0%a5%af-%e0%a5%a7%e0%a5%ae%e0%a5%a7%e0%a5%ae","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}