{"product_id":"margi-ani-deshi-मार्गी-आणि-देशी-by-shridhar-nalini-shantaram-tilve-naik","title":"Margi Ani Deshi मार्गी आणि देशी by Shridhar Nalini Shantaram Tilve Naik","description":"\u003cp\u003eShridhar Nalini Shantaram Tilve Naik श्रीधर नलिनी शांताराम तिळवे नाईक : Margi Ani Deshi मार्गी आणि देशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचौथी नवता’ हा शब्द मी नव्वदीच्या दशकात ऐकलेला. ह्या शब्दाची एकदम भूल पडलेली. ह्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशब्दाचे प्रणेते होते दस्तुरखुद श्रीधर तिळवे. श्रीधरचे नाव ऐकून होतो. कविता, समीक्षा, सिनेमा,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचित्रकला, फिल्मबाजी, भविष्य पाहणे इत्यादी त्याचे अनेक पैलूही ऐकिवात होते. त्याच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेगळ्या कवितेचाही दबदबा होता. आम्ही गावकोपच्यातली माणसं, कवितेत लुडबुड करत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसलेली. अशातच हा ‘चौथी नवता’ शब्द अलवारपणे कानावर पडलेला व खळबळ सुरू\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eझालेली. हे चौथ्या नवतेचे काय गौडबंगाल आहे, हे समजायला मार्ग नव्हता; मात्र ह्याची जोरदार\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचर्चा सुरू झालेली. श्रीधरने त्याची बाजू ठाम मांडलेली व त्यासोबत ‘चिन्ह संस्कृती’ हासुद्धा एक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअद्भुत बाण मराठी कवींवर सोडलेला. आता कविता तर लिहिलेल्या आहेत; पण त्या ‘चौथी’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहेत की नाही, ह्याचा एक जोरदार पेच आम्हा गावगल्लीतल्या कवींपुढे निर्माण होताना दिसू\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलागलेला ! धावता धावता एकदम थांबावे तसे काही कवींनी लिहिता लिहिता थांबा निर्माण\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेलेला, हालत खराब झालेली, एकदम झिनझिनाट! आता आपलं काही खरे नाही असं वाटू\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलागलेलं. गावगल्लीतला एक कविमित्र म्हनला, “च्यायला, आपलं कवितेतलं करिअर संपलं.”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचौथ्या नवतेची डाळ काही आपल्या भांड्यात शिजणार नाहीच ह्याचं दुःख त्याच्या बोलण्यातून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eटपकताना दिसलं. मी त्याला म्हनलो, “सलिम लंगडे पे मत रो।” प्राचीन कविता ते साठोत्तरी –\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्वांना फाट्यावर मारून आता ‘चौथी नवता’. काही कवींकडून समजून घेतले की चौथी नवता\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमंजे एकदम फ्रेश माल, मंजे पूर्वसुरीचा काहीच प्रभाव नसलेलं, भीडसे अलग, नो उचलाउचली,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहटके, मोडलोड, लय भारी डॉट कॉम, असे काय काय ! हे एकदम जोरदार होतं. श्रीधरभायने\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबोला तो कुछ तो बात जरूर होगी! उसका मराठी कवितेमे रुतबा और हुकूम था। उसकी समीक्षा में\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभी अलग आवाज थी। जो बोलता हूँ, में वही करता हूँ। जो नहीं बोलता हूँ, वो तो डेफिनेटली\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकरता हूँ, असा बाणा ह्याची देही व ह्याची डोळा पाहणारी बरीच मंडळी होती. भाईने बोल दिया ना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचौथी नवता, फिर खल्लास, ज्यादा आवाज नहीं करनेका। लिखनेका… वो भी ‘चौथी नवता’ में,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनहीं तो खल्लास ! आपली तर एकदम पाचावर धारणच बसलेली. आयला, ये सब कहा से लाने\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eका? इतके दिवस जे काही लिहून झालं ते मंजे एकदम फाफुगिरी की काय? श्रीधरने हंटर काढला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहोता व त्याच्या फटकाऱ्याखाली अनेक कवी येताना दिसू लागले. आपली नेहमीची कवितेची\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभाषा बदलू लागलेले, मोडतोड करू लागलेले, अपना भी नाम ये चौथी नवता के टायटल के\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनीचे आना मंगता है, बापू असे एकमेकांना सुचवू लागलेले, तू चौथ्या नवतेत नाही? मंजे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकायतरी तुझा केमिकल लोचा आहे रे गड्या, असे वाटू लागलेले. भायने बोल दिया, ये चौथे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनवतेमे ये कवी है। बोल तू क्या बोलता है? आपन तर झाटूक माटूक काय बोलनार? हा भाय,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआप एकदम सही है। मुरलीधरने तिसरा टाकावा तसा हा कवी ‘चौथी नवता’ टाकतो मनून आपून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमान डोलावलेली. क्या डाला है चौथा! एकदम सामनेवाला तो क्लीन बोल्ड !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– वर्जेश सोळंकी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53035015373079,"sku":null,"price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-05-04215601.png?v=1777910000","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/margi-ani-deshi-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80-by-shridhar-nalini-shantaram-tilve-naik","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}