Akshargranth
Maulik Ambedkar मौलिक आंबेडकर Bhalchandra Mungekar, Anagha Lele भालचंद्र मुणगेकर / अनु. अनघा लेले
Maulik Ambedkar मौलिक आंबेडकर Bhalchandra Mungekar, Anagha Lele भालचंद्र मुणगेकर / अनु. अनघा लेले
Couldn't load pickup availability
Maulik Ambedkar मौलिक आंबेडकर Bhalchandra Mungekar, Anagha Lele भालचंद्र मुणगेकर / अनु. अनघा लेले
भारताची राज्यघटना साकारण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे भारतीय लोकशाहीचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे मागास वर्गांच्या, विशेषतः अस्पृश्यांच्या प्रति केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या आणि सवर्ण हिंदूंच्या जातीय राजकारणाच्या विरोधातील त्यांच्या परखड टीकेबद्दलही ओळखले जातात. स्वतः अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलेल्या बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पायरीवर सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला. केवळ दलितच नव्हे तर स्त्रिया तसेच इतर सर्व शोषितांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल ते सातत्याने बोलत असत, ज्यापैकी बरेचसे आजच्या परिस्थितीलाही लागू होते. त्यांच्या लिखाणातही त्यांची ही कळकळ प्रतिबिंबित झाली आहे.
‘मौलिक आंबेडकर’मध्ये आंबेडकरांच्या प्रभावशाली लिखाणाचे सार समजून घेता येईल असे उतारे निवडले आहेत व त्यांची विषयवार मांडणी केली आहे. त्यामध्ये जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता, हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, स्त्रियांची मुक्ती, भारताचे शैक्षणिक धोरण, फाळणी आणि इतर अनेक विषय आहेत. हे पुस्तक म्हणजे त्वरित संदर्भ बघण्यासाठीचा एक उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. तसेच आंबेडकरांच्या कामाशी अपरिचित असलेल्या वाचकांना त्यांच्या विचारांची ओळखही ते करून देते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अमूल्य वारशाप्रति ही आदरांजली !
Share
