Akshargranth
Mumbai Te Mumbai Bhag 1 - मुंबई ते मुंबई भाग १
Mumbai Te Mumbai Bhag 1 - मुंबई ते मुंबई भाग १
Couldn't load pickup availability
Mumbai Te Mumbai Bhag 1 by Ajit Vartak - मुंबई ते मुंबई भाग १ by अजित वर्तक
वर्तकांची फिरस्तेगिरी हा त्यांच्या जीवननिष्ठेचा भाग
श्री. अजित वर्तक यांनी आपल्या फिरस्तेगिरीवर लिहिलेलं 'मुंबई ते मुंबई' हे पुस्तक (दोन भागांत) रोचक आणि वाचनीय आहे. प्रवासाची हौस सगळ्यांना असतेच; पण प्रवास हा वर्तकांच्या जीवननिष्ठेचा भाग आहे.
वर्तकांच्या प्रवासाचा पट मोठा आहे. नोकरीनिमित्तानं देशविदेशाची मुशाफिरी त्यांना घडली. तसंच, मित्र नि कुटुंबीयांसह देखील त्यांनी मनसोक्त भटकंती केली. ते सगळे अनुभव त्यांनी सोप्या नि रसाळ शब्दांत मांडलेत. चार मित्रांच्या मैफलीत बसून वर्तक आपले प्रवासकिस्से सांगताहेत, असा लिखाणाचा एकूण ऐसपैस बाज आहे. हे या पुस्तकाचं मोठं यश आहे.
अजित वर्तक यांचं हे पहिलंच पुस्तक. वाचक खुल्या मनानं 'मुंबई ते मुंबई'ला हिरवा कंदिल दाखवतील आणि वर्तकांचा पुढचा लेखनप्रवास निर्विघ्न आणि आनंददायी होईल, असा विश्वास वाटतो.
- अंबरीश मिश्र
Share
