{"product_id":"pageer-by-bharat-daundkar","title":"Pageer by Bharat Daundkar","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eपागीर । भरत दौंडकर \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eपागीर म्हणजे हाताने फेकता येणारं गोलाकार जाळं. एकदा का हे जाळं\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eअंगावर पडलं की ते माशांची जिवंत सळसळ थांबवतं. अंगावर पडलेल्या\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eपागीरातून माशांना निसटता येत नाही. पागीर खांद्यावर घेऊन नदीकाठ\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eधुंडाळणारे कोळी, भोई दिसतात. त्यांच्या जीवन संघर्षाची धडपड भरत\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eदौंडकर यांनी रेखाटली आहे. हे एका कवीचं गद्यलेखन असल्याच्या खुणा\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eपाना-पानावर दिसून येतात. माशांचे अगणित प्रकार, जाती, लक्षणं, वैशिष्ट्य\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eया लेखनात आहेत. वाम, कटला, रोहू, मरळ अशी नावं आपल्याला परिचित\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eअसतात पण खदरा, खडशी, बोबर, मुळांड, तांभरा, इचका, आहेर, सुरक्या,\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eशेंगळ, कुर्डु अशी माशांची असंख्य स्थानिक नावं… भीमा, भामा, इंद्रायणी,\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eमुळा, मुठा, गोदावरी, पंचगंगा, कृष्णा अशा अनेक नद्यांच्या पोटात सामावणारं\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eहे चमचमणारं चांदणं. जणू पाण्याच्या पोटातली चांदी…\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eकाळ बदलला. चिलापीसारख्या माशांचं प्रस्थ वाढत गेलं. तर कुठे प्रदूषणाचं\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eजहर पाण्यात मिसळल्यानेही अनेक जाती नामशेष व्हायला लागल्या. माणूस\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eआणि मासा दोघांचंही सारखंच आहे. ज्यांची धडपड, सळसळणं अविरत आणि\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eनिरंतर तेच जीवनाच्या संघर्षात टिकतात. भरत दौंडकर यांच्या पागीर मधून\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eनदीच्या पोटातल्या खळबळ, तगमग आणि तडफडीचा तसेच नदीकाठच्या\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eलोकजीवनाचा दुर्लक्षित पदर खूपच बारकाव्यानिशी आला आहे. तरतरीत\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eअशा नव्या संदर्भांचा ऐवज या लेखनात आहे. वाचकांना हे लेखन नक्कीच\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eवेगळा आनंद देऊन जाईल.\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67767937564951,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Pageer_by_Bharat_Daundkar.png?v=1791984127","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/pageer-by-bharat-daundkar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}