{"product_id":"panchgangechya-teeravarun-by-dr-jaysingrao-pawar","title":"Panchgangechya Teeravarun By Dr. Jaysingrao Pawar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसांगली जिल्ह्यातील तडसर गावातील एका शेतकर्याचा मुलगा कोल्हापुरात शिकायला येतो आणि शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून इतिहास संशोधक-प्राध्यापक-लेखक होतो. इतिहास क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी त्याचा परिचय होतो आणि यशस्वीपणे त्याचं जीवन घडत जातं. हा जीवनप्रवास आहे नामवंत ज्येष्ठ इतिहास-संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा. या आत्मचरित्रातून त्यांचं शालेय, महाविद्यालयीन, कौटुंबिक जीवन उलगडतं. त्यांचा संशोधनाचा, लेखनाचा, प्राध्यापकीचा प्रवास तपशिलाने उद्धृत केलेला दिसतो. त्या-त्या वेळच्या महत्त्वाच्या घटना (उदा. जेम्स लेन प्रकरण, दादाजी कोंडदेव प्रकरण इ.) काही ठिकाणी तपशिलाने तर काही ठिकाणी संक्षिप्तपणे नोंदवल्या आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीने प्रेरित या व्यक्तिमत्त्वाच्या या आत्मचरित्रातून सामाजिक, राजकीय परिस्थतीही उलगडते. त्यामुळे हे आत्मचरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52692429603095,"sku":null,"price":1349.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-07213959.png?v=1775576321","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/panchgangechya-teeravarun-by-dr-jaysingrao-pawar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}