1
/
of
1
Akshargranth
Petersburgcha Ustad by by J.M. Coetzee पीटर्सबर्गचा उस्ताद - जे. एम. कुट्सी भाषांतर : अवधूत डोंगरे
Petersburgcha Ustad by by J.M. Coetzee पीटर्सबर्गचा उस्ताद - जे. एम. कुट्सी भाषांतर : अवधूत डोंगरे
Regular price
Rs. 0.00
Regular price
Sale price
Rs. 0.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Petersburgcha Ustad by by J.M. Coetzee, Avdhoot Dongare
The Master of Petersburg (Marathi Edition) by J.M. Coetzee (Author)
जे. एम. कुट्सी यांच्या ‘पीटर्सबर्गचा उस्ताद’ या कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील रशियन लेखक फ्योदोर दस्तयेवस्की मध्यवर्ती पात्र म्हणून आलेला आहे. कादंबरीतल्या दस्तयेवस्कीचा पावेल हा सावत्र मुलगा १८६९ साली पीटर्सबर्गमध्ये भाड्याने राहत असतो. तिथे तो एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मरण पावल्याची तार त्या वेळी जर्मनीत ड्रेस्डनमध्ये असलेल्या दस्तयेवस्कीला मिळते. मग तो तडक पीटर्सबर्गला येतो.
आपल्या मुलाचा मृत्यू नक्की कसा झाला, तो राजसत्तेविरोधात कट करणाऱ्या संघटनेशी संबंधित होता का, या संघटनेच्या नेत्याला एकंदर समाजाविषयी काय वाटतं, तसंच का वाटतं, ते वाटणं फक्त विचारसरणीमधून आलंय की हा त्याहून अधिक खोलातला काही संघर्ष आहे, अशा प्रश्नांचा शोध कुट्सींच्या कादंबरीतला दस्तयेवस्की घेत जातो. एकीकडे मुलाच्या मृत्यूने दस्तयेवस्की शोकाकुल झालाय, तर दुसरीकडे तो या शोकाचं रूपांतर लेखनात करू पाहतोय. हे करत असताना त्याला व्यक्तिगत नात्यासोबतच परिसरातल्या घडामोडींविषयीचे प्रश्न सतावतायंत. यातून त्याच्या लेखनाचा आशय गोळा होत जातो. दस्तयेवस्कीसारखा उत्कट लेखक या आशयाला कसा भिडत असेल, त्यातल्या सुष्ट, दुष्ट आणि त्या दरम्यानच्या असंख्य जटिल छटांशी तादात्म्य पावताना त्याचं काय होत असेल, याचा शोध घेण्याचा प्रयत्न कुट्सींनी ‘पीटर्सबर्गचा उस्ताद’मध्ये केला आहे
Share
