1
/
of
1
Akshargranth
Prasangopaat - Bhag 1 : Vivad-Sanvad By Sharad Navare प्रसंगोपात – भाग : १ – विवाद-संवाद
Prasangopaat - Bhag 1 : Vivad-Sanvad By Sharad Navare प्रसंगोपात – भाग : १ – विवाद-संवाद
Regular price
Rs. 445.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 445.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Prasangopaat - Bhag 1 : Vivad-Sanvad By Sharad Navare प्रसंगोपात – भाग : १ – विवाद-संवाद
प्रसंगोपात – भाग : १ – विवाद-संवाद
प्रा. शरद नावरे यांचे हे प्रसंगपरत्वे लिहिलेले लेख. विवाद, संवाद, सूत्रलेख, परीक्षणे आणि प्रतिक्रियात्म असे त्याचे स्वरूप. नावरे यांच्या समीक्षेत साहित्य आणि समाज यातील आंतरसंबंधांचा चौफेर असा वेध आहे. त्यांच्या समीक्षादृष्टीवर मार्क्सवादी विचारांचा सुस्पष्ट असा प्रभाव आहे. अर्थात तो पोथीनिष्ठ वा श्रद्धाळू नाही, तर तो चिकित्सक स्वरूपाचा आहे. या लेखनातून नावरे यांचा म्हणून एक समीक्षाविचार ध्वनित झाला आहे. तो आर्थिक, सामाजिक व तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात कला आणि वाङ्मयाचा विचारांना महत्त्व देणारा आहे. यासंदर्भात शतकभरातील मराठीतील जडवादी कलामीमांसेचा त्यांनी घेतलेला शोध हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. नावरे यांच्या समीक्षेवर प्रस्थापित लेखक समीक्षकांच्या विचारांचे दडपण, ओझे नाही – त्यामुळेच ते कॉ. शरद् पाटील, गो. पु. देशपांडे व त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या विचारमर्यादांचा साक्षेपाने विचार करू शकले आहेत. नावरे यांच्या या एकंदर समीक्षेत मराठी समीक्षेची चिकित्सक पाहणी (इन्क्वायरी) आहे. त्यामुळेच मराठी समीक्षेतील चकव्यांचा ते शोध घेऊ शकले आहेत. प्रश्नमांडणी, खंडनमंडन व सूत्रनिष्कर्ष असे नावरे यांचे लेखन पद्धतिशास्त्र आहे. त्यात तत्त्वज्ञानात्मक व कलाविषयक संकल्पनात्मक मांडणीची सुसंगत अशी स्पष्टता आहे. या समीक्षेत साहित्य कलेविषयीच्या मर्मदृष्टीबरोबर खुली, अनावर संवादशीलता आहे. त्यात अन्वयार्थदृष्टीला प्राधान्य आहे. ही समीक्षा गौरवप्रधान वा भावविवश नाही. प्रतिपाद्य विषयाची सुस्पष्टता, विविध ज्ञानशाखीय दृष्टिकोणांचा संदर्भपट, वस्तुनिष्ठ तर्कशुद्धता, तौलनिक दृष्टी, विवेकी सृजनत्व हे नावरे यांच्या लेखनशैलीचे विशेष होत. तसेच त्यांच्या शैलीत एक प्रशांत असा मिश्कीलपणाचा सौम्य सूर आहे. कोपणे एके काळी मराठीत अशा प्रकारची मतमतांतरांची वाङ्मयीन चर्चा इतकी सदृढ आणि निकोप होती, याचे अप्रूप वाटावे असे हे लेखन, त्यामुळे मराठीतील तात्त्विक समीक्षाविचाराला पुढे घेऊन जाणारी विचारसूत्रे शरद नावरे यांच्या या समीक्षेत आहेत. – रणधीर शिंदे
Share
