Akshargranth
Radha, Urmila, Parvati By Samar राधा + उर्मिला + पार्वती - गाजलेल्या 3 कादंबऱ्या Special Combo offer
Radha, Urmila, Parvati By Samar राधा + उर्मिला + पार्वती - गाजलेल्या 3 कादंबऱ्या Special Combo offer
Couldn't load pickup availability
Radha, Urmila, Parvati By Samar राधा + उर्मिला + पार्वती - गाजलेल्या 3 कादंबऱ्या Special offer at Akshargranth
उर्मिला- 1. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित मराठी कादंबरी.
2. उर्मिलेच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समग्र जीवनाचे चित्रण करणारी पहिली कादंबरी.
3. मिथिलेतील बालपणापासून ते दोन राज्यांची राजमाता होईपर्यंत तिच्या जीवनाचे अनेक पैलू कादंबरीतून समोर येतात.
4. 'महाकाव्य शिवप्रताप', 'तथागत' (कादंबरी), ‘महाराजाधिराज’ (कादंबरी) आणि ‘महाभारतातील अद्भुत रहस्ये' लिहिणाऱ्या समर यांची कांदबरी!
राधा - श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद!'
पार्वती- पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत शिवप्रिया पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेणारी कादंबरी !
पार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.
Share
