Akshargranth
Sanskrutichya Kondanatil Leelavati by Medha Limaye - संस्कृतीच्या कोंदणातील लीलावती
Sanskrutichya Kondanatil Leelavati by Medha Limaye - संस्कृतीच्या कोंदणातील लीलावती
Couldn't load pickup availability
भास्कराचार्य यांच्या सिद्धांतशिरोमणी ग्रंथातील लीलावती हा भाग भारतीय गणिताच्या सुवर्णकाळाची एक चिरंतन साक्ष आहे. गणिताचे आदर्श पाठ्यपुस्तक म्हणून लीलावतीचा लौकिक आजही का टिकून आहे हे या पुस्तकात सुंदर पणे पुढे आले आहे. लीलावतीमधील गणिताची व्याप्ती, निसर्गाशी जवळीक आणि दैनंदिन व्यवहार व सामाजिक चालीरीतींशी सांगड हा एक पैलू झाला, त्याशिवाय काटेकोर पण कानाला मधुर वाटेल अशा छंदबद्ध श्लोकांची रचना हा अतिशय महत्त्वाचा घटक देखील अलगदपणे सादर केला गेला आहे. त्या संदर्भात लीलावतीचे लालित्य या प्रकरणात लयबद्धता, ओघवती शैली आणि ग्रंथाची सौष्ठवपूर्ण रचना यांवर रम्यपणे प्रकाश टाकला आहे. लीलावतीमधील नमुनादाखल ५० गणिती प्रश्नांचे मूळ श्लोक, अन्वय आणि मराठी व इंग्रजी भाषांमध्ये अर्थ, तसेच प्रत्येक पद्याचे वृत्तही दिल्यामुळे भास्कराचार्यांच्या गणिताची आणि लेखनक्षमतेची महत्ता समजण्यास मदत झालीआहे. शीर्षकाला पूर्णपणे न्याय देणारे हे पुस्तक वाचनाचा एक समृद्ध आनंद देऊन जाते.
Share
