Akshargranth
SAVYASACHI सव्यासाची by SaratChandra Chattopadhyay, BHA. VI. (MAMA) VARERKAR
SAVYASACHI सव्यासाची by SaratChandra Chattopadhyay, BHA. VI. (MAMA) VARERKAR
Couldn't load pickup availability
स्वातंत्र्य लढ्याची राजकीय पार्श्वभूमी असलेली सव्यसाची ही कादंबरी म्हणजे शरद साहित्याचे सर्वोच्च शिखर आहे. नरहर कुरुंदकरांनी या भव्य कादंबरीचे भरभरून कौतुक केले आहे. कलकत्त्याचे त्या वेळचे पोलीस कमिशनर शरच्चंद्रांना म्हणाले होते, "शरद बाबू, कुठेही आम्ही क्रांतिकारकांना पकडल्यावर त्यांच्याकडे दोन पुस्तकं सापडतात, गीता आणि सव्यसाची. या कादंबरीने क्रांतिकारकांना वेड लावलं आहे." क्रांती व स्वातंत्र्याच्या भव्य स्वप्नाने भारावलेला तिचा साहसी नायक सव्यसाची कोणत्या क्रांतिकारकावरून घेतला आहे याविषयी अनेक तर्क केले जातात. रासबिहारी बोस, अरविंद घोष, सुभाषचंद्र बोस वगैरेंची नावे येतात. पण यातील कोणी एक नव्हे तर या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वांची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये एकत्र झाल्यासारखी वाटतात.
Sadhana Prakashan |
Share
