{"product_id":"sindhi-by-rohini-tukdeo-onkar-thorat","title":"Sindhi by Rohini Tukdeo, Onkar Thorat","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजिच्याशी तुमचं सारं आयुष्य सर्वार्थाने बांधलं गेलेलं असतं, त्याच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eभूमीतून अचानक उखडून फेकलं जातं आणि एका क्षणात होत्याचं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनव्हतं होतं. तेव्हा समोर सर्वत्र नुसता अंधार पसरतो. जगण्याचे सारे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमार्ग बंद होतात. कुठे जावं, काय करावं आणि कसं जगावं असे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनेक प्रश्न समोर उभे ठाकतात. तरीही जगण्याची धडपड सुटत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनाही. रडतखडत, ठेचकाळत का होईना धडपड चालू राहते आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eएक वेगळं विश्व नव्यानं साकारते. त्याचीच ही कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eखरंतर ही कहाणी आहे सिंधी समूहाची. ज्यांनी फाळणीची दाहकता \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनुभवली, अचानक उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या स्थलांतराची वेदना \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनुभवली, त्यानंतरची विस्थापितांच्या वाट्याला येणारी आयुष्याची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eफरफट आणि ससेहोलपट अनुभवली अशा सिंधी समूहाची ही कहाणी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआहे. यात व्यथा आहेत, वेदना आहेत, विरहाचं दुःख आहे, जगणं उद्ध्वस्त \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eझाल्याची आणि परिणामी सारं काही गमावल्याची तीव्र सल आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसं असूनही त्यात दुःखाला कवटाळून बसण्याचं भावनाशून्य गोठलेपण \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनाही, तर यातून बाहेर पडण्याची सजगपणे केलेली धडपड आणि नवी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमूल्ये अंगीकारत नव्यानं उभं राहत वेगळी ओळख निर्माण करण्याची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eउमेद आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e...आणि म्हणूनच विस्थापनाच्या आणि त्यानंतरच्या आर्थिक विपन्नतेच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमहाभयंकर संकटाशी सामना करावा लागल्यानंतरसुद्धा, हा समूह \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअल्पसंतुष्टता आणि परात्मभाव यांच्या खोड्यात अडकून पडत नाही. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eउलट अत्यंत बिकट परिस्थितीतही गवसलेली बहुअस्मिता आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबहुसांस्कृतिकता ही अनमोल मूल्ये अंगिकारतो. आणि हाच सकारात्मक \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदृष्टिकोन जोपासत तो उद्योजकतेचा नवा अवकाश घडवत नवभारताच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि नव्या आर्थिक युगाच्या निर्माणात आपला वेगळा ठसा उमटवतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्याची ही प्रेरक शोधगाथा ... प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी, लादल्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगेलेल्या विस्थापनातून घडलेल्या जिद्दीची कहाणी...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eSindhi | Rohini Tukdeo, Onkar Thorat\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसिंधी । रोहिणी तुकदेव, ओंकार थोरात\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":52814127431959,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-04-20215928.png?v=1776700656","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/sindhi-by-rohini-tukdeo-onkar-thorat","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}