Akshargranth
Swabhavala Ausadh Aahe By Rama Marathe स्वभावाला औषध आहे
Swabhavala Ausadh Aahe By Rama Marathe स्वभावाला औषध आहे
Couldn't load pickup availability
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत. अशामुळं मानसिक व्यथा आणि विकार तर उद्भवतातच; पण ज्यांना सायको सोमॅटिक डिसीजेस (Psycho-Somatic Diseases) म्हणून संबोधलं जातं, असे शारीरिक विकारही यातूनच उद्भवतात. मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे विकार म्हणजे दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह, हृद्रोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब, संधिवात, नाना प्रकारचे त्वचारोग, मासिक पाळीसंबंधी तक्रारी इत्यादी. मानसिक तणावामुळं हे विकार वाढीला लागतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास आत्यंतिक मदत होते. विकृत मनःस्थिती, मानसिक रोग व तदनुषंगिक शारीरिक विकार यांवर डॉ. बॅच यांनी प्रदीर्घ संशोधनांती सिद्ध केलेल्या पुष्पौषधींचा रामबाण इलाज होतो. केवळ शारीरिक तक्रारींसाठीदेखील ही औषधं उपयोगात आणली जातात, परंतु त्यांची योजना मात्र त्या वेळच्या विशिष्ट मानसिक लक्षणांवरूनच करण्यात येते. पुष्पौषधी या नवीन उपचार पद्धतीचं विस्तृत विवरण करणारं मराठीतील हे पहिलंच पुस्तक म्हणावं लागेल.
Share
