1
/
of
1
Akshargranth
Tao Te ching by Lao Tzu, Avdhoot Dongre ताओ ते चिंग - लाओ त्सू , अवधूत डोंगरे
Tao Te ching by Lao Tzu, Avdhoot Dongre ताओ ते चिंग - लाओ त्सू , अवधूत डोंगरे
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Tao Te ching by Lao Tzu, Avdhoot Dongre ताओ ते चिंग - लाओ त्सू , अवधूत डोंगरे
ताओ ते चिंग - लाओ त्सू / भाषांतर - अवधूत डोंगरे
पुस्तकातील अंश :
मनातील सर्व विचार काढून टाका.
तुमचं चित्त स्थिर होऊ द्या.
हजारो गोष्टी उदयाला येऊन लयाला जाताना पाहा,
पण त्या परत कशा जातात त्यावर मननही करा.
उगमापाशी परत जाणं हेच स्थैर्य आहे,
हीच निसर्गाची रीत आहे.
निसर्गाची रीत अचल असते.
स्थैर्य जाणणं म्हणजेच मर्मदृष्टी.
स्थैर्य न जाणण्यातून विध्वंस घडतो.
स्थैर्य जाणल्याने मन खुलं होतं.
खुल्या मनाने अंतःकरण विशाल होतं.
विशाल अंतःकरणाने कृती उदात्त होते.
उदात्त कृतीने दैवी स्थिती साधते.
दैवी स्थिती साधणं म्हणजेच ताओशी तादात्म्य.
ताओशी साधलेलं तादात्म्य शाश्वत असतं.
शरीर मरण पावलं तरी ताओ मरण पावत नाही.
(सूत्र क्र. १६)
----------------------------------
लाओ त्सूची अनेक सूत्रं गूढ आणि आकलनातीत असली तरी ताओसोबत तादात्म्य पावण्यासाठी लाओ त्सूनं अनेक सूत्रांतून अतिशय साध्या-सरळ आणि सोप्या भाषेत केलेला उपदेश मोहून टाकतो. ‘जाणून असलेला बोलत नाही. बोलत राहणारा जाणत नाही’, ‘बदनामीही स्वेच्छेने स्वीकारावी. दुर्दैवही मानवी स्थिती म्हणून स्वीकारावं’, ‘काम संपल्यावर मागे सरावं. स्वर्गाकडे जाणारा रस्ता हाच’, ‘सौम्य असणारं कठोरपणावर मात करतं. संथ असणारं गतिमानतेवर मात करतं’, ‘मासा खोल पाण्यात बुडी मारून जगतो. आपणही जगताना दृष्टिआड खोल राहावं’, ‘अंधारात पाहणं ही मर्मदृष्टी. नमतं घेणं हे सामर्थ्य’, ‘कडक नि ताठर असणारा असतो मृत्यूचा अनुयायी. नरम नि लवचीक असणारा असतो जीवनाचा अनुयायी’, ‘ज्ञानी व्यक्ती अमूल्य खड्यांसारखी दीपवत नाही, तर साध्या दगडासारखी खडबडीतच राहते’ इ. लाओ त्सूची सूत्रं पाहिली की, त्यातील रूढ संकेतांना छेद देणारा विचार चकित करतो.
असा हा मार्ग. साधेपणा, संयम, सहानुभूती, सहनशीलता, विनयशीलता शिकवणारा. सौम्य असण्यातलं सामर्थ्य दर्शवणारा. अज्ञानातलं प्रबुद्धत्व दाखवणारा. स्वत:ला जाणून घ्यायला सांगणारा. अकर्मक राहून साध्य करायला शिकवणारा. परस्परविरोधी गोष्टींमधील सुसंगती उलगडून दाखवणारा. घराबाहेर न पडता, दार उघडून जगाचं दर्शन घडवणारा. खिडकीबाहेर न डोकावता, ताओचा मार्ग दाखवणारा. दीर्घायुष्य बहाल करणारा, शहाणपण देणारा आणि शांतता प्रस्थापित करणारा.
Laozi was an ancient Chinese philosopher and writer. He is known as the reputed author of the Tao Te Ching and the founder of philosophical Taoism, and as a deity in religious Taoism and traditional Chinese religions. Although a legendary figure, he is usually dated to around the 6th century BC and reckoned a contemporary of Confucius, but some historians contend that he actually lived during the Warring States period of the 5th or 4th century BC. A central figure in Chinese culture, Laozi is claimed by both the emperors of the Tang dynasty and modern people of the Li surname as a founder of their lineage. Laozi's work has been embraced by various anti-authoritarian movements as well as Chinese Legalism.
Lao Tzu | Avdhoot Dongre | Paperback |
Share
