{"product_id":"the-haunting-of-hill-house-by-shirley-jackson","title":"The Haunting of Hill House by Shirley Jackson","description":"\u003ch1 class=\"product-single__title\"\u003eद हाँटिंग ऑफ हिल हाऊस\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\n\u003c\/h1\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकोणताही सजीव फार काळ, संपूर्ण वास्तवात, डोकं ठिकाणावर ठेवून राहू शकत नाही; काहींच्या मते तर भारद्वाजासारखे पक्षी आणि नाकतोड्यासारखे कीटकही स्वप्नं बघतात. हिल हाऊस मात्र, शहाणपण गमावून, पण किर्र अंधार पोटात घेऊन त्या टेकडीसमोर उभं होतं... ऐंशी वर्षांपासून, आणि कदाचित आणखी ऐंशी वर्षंही तसंच उभं! घराच्या आत भिंती सरळ उभ्या होत्या, विटा एकमेकींना व्यवस्थित चिकटून होत्या, फरश्या जागेवर घट्ट होत्या आणि दरवाजेही समजूतदारपणे बंद होते; हिल हाऊसमधल्या प्रत्येक लाकडावर, प्रत्येक दगडावर शांतता स्तब्धपणे पसरलेली होती. इथे जे काही वावरत होतं, ते एकटंच वावरत होतं.\u003cbr\u003eही नेमकी कुणाची गोष्ट आहे? भुताची?... अतृप्त आत्म्यांची?... या घरात राहता राहता मरण पावलेल्या माणसांची?... या घराची?... की आपल्याच मनात खोल दडून बसलेल्या भीतीची?... रुतून बसलेल्या अपराधीपणाची?... की अंगावर कोसळलेल्या एकटेपणाची?... प्रश्न अनेक आणि उत्तर एक... की उत्तरं अनेक आणि प्रश्न एक?\u003cbr\u003eफक्त घराचा नाही, तर मनाचा भुलभुलैय्या करणारी... सतत चकवा पाडत राहणारी ही कादंबरी मनाचा कब्जा घेतल्याशिवाय राहत नाही. आपण कब्जा द्यायला तयार आहोत का... प्रश्न फक्त एवढाच आहे.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":67785468838167,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/The_Haunting_of_Hill_House_by_Shirley_Jackson.png?v=1792053158","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/the-haunting-of-hill-house-by-shirley-jackson","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}