{"product_id":"uttarayan-by-suresh-dwadashiwar","title":"Uttarayan by Suresh Dwadashiwar","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eज्ञानाएवढेच अज्ञानही अनंत आहे. पहिल्याचा अंत दिसत नाही आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदुसऱ्याचा आरंभ हाती येत नाही. दिवस संपू नये आणि रात्रीचा मागमूस \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eलागू नये अशीच काहीशी संध्याछायेसारखी ही स्थिती आहे. मात्र ही \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसायंकाळ अल्पजीवी असली तरी आपला तिच्यातला प्रवास अंतहीनच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवाटू लागतो, असे का?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकाळ बदलला, स्थिती बदलली; पण त्यातले चालणे सुरूच राहिले. त्याला \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eथांबा का नाही? जरा कुठे विसावून मागोवा घ्यावा असे मनातही येत नाही... \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eझालेच तर पुढच्या प्रवासाचा अंदाज घ्यावा असेही का वाटत नाही? यात \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचालणे आहे, थकणे आहे आणि नुसतीच ओढाताण आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसर्वोच्च पदावरची माणसे अस्वस्थ, ज्ञानवंत म्हणविले गेलेले अशांत आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसामान्य माणसे...? ती तर नुसतीच चाचपडणारी अन् काहीएक हाती न \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eलागलेली. जे लागले तेही पुढल्या क्षणी मातीमोल वाटून घेणारी. या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eधडपडीला शेवट नाही आणि तिच्यातल्या प्राप्तीलाही पूर्णता नाही. अपुऱ्या\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजीवाचा हा एक अंतहीन प्रवास आहे. गवसले तेच पूर्ण समजायचे आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्यातच रमून थांबायचे असेल तर मग जगण्यात आणि मरण्यात कोणते \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअंतर राहते?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअशा वेळी मनात येते, या अंतराची वाटचाल हेच आयुष्य आहे काय? या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रश्नाला धर्माजवळ उत्तर नाही, तत्त्वज्ञान ते देत नाही आणि विज्ञानाला \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतर ते द्यायचेही नाही...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eUttarayan | Suresh Dwadashiwar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eउत्तरायण । सुरेश द्वादशीवार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53035086381335,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-05-04223206.png?v=1777912183","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/uttarayan-by-suresh-dwadashiwar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}