{"product_id":"vidyarthyansathi-bhagvadgita-by-renu-dandekar","title":"Vidyarthyansathi Bhagvadgita by Renu Dandekar","description":"\u003cp\u003eआजच्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श नाही, मूल्ये कशी जपावीत, हे त्यांना माहीत नाही, अशी ओरड नेहमी केली जाते. पण पुस्तके, ग्रंथ हे विद्यार्थ्यांचे मित्र, मार्गदर्शक होऊ शकतात, हे पालकांच्या आणि मुलांच्या मनावर बिंबवणे जास्त आवश्यक आहे. कारण इतके महान ग्रंथ आपल्या आजूबाजूला आहेत, ते जर मुलांनी समजून घेतले तर त्यांच्यावर वेगळे संस्कार करण्याची गरजच भासणार नाही. या उद्देशाने रेणू दांडेकर या प्रसिद्ध लेखिकेने प्राचीन ज्ञानवारशातील काही ग्रंथांचे विद्यर्थ्यांसाठी सोपीकरण करायचे ठरवले आणि त्यातील एक भाग म्हणजे मुलांसाठी भगवद्गीता हे पुस्तक. भगवद्गीतेतील आशय सोप्या शब्दात आणि आजची उदाहरणे देऊन समजावण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. सोबत आवश्यक ती चित्रे, तत्कालीन समाजाचे वर्णन अशा पूरक गोष्टींचाही समावेश आहे. माध्यमिक ते महाविद्यालयीन गटासाठी निर्मित हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या मनात भग्वद्गीतेविषयी ओढ निर्माण करेल आणि ते मूळ ग्रंथ पाहण्यास, वाचण्यास प्रवृत्त होतील, या हेतूने लेखिकेने हा प्रयत्न केला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshargranth","offers":[{"title":"Default Title","offer_id":53540283220247,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0772\/5016\/7063\/files\/Screenshot2026-06-15215841.png?v=1781538923","url":"https:\/\/akshargranth.in\/products\/vidyarthyansathi-bhagvadgita-by-renu-dandekar","provider":"Akshargranth","version":"1.0","type":"link"}