Akshargranth
Yugandhar Shivray - युगंधर शिवराय by Dr Sumanta Datta Tekade
Yugandhar Shivray - युगंधर शिवराय by Dr Sumanta Datta Tekade
Couldn't load pickup availability
Yugandhar Shivray - युगंधर शिवराय by Dr Sumanta Datta Tekade
'युगंधर शिवराय'मधून डॉ. सुमंत टेकाडे यांनी शिवरायांचे स्वराज्य निर्मितीमागील प्रभावी नियोजन व यशस्वी व्यवस्थापन यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. शिवप्रभूचे दूरदर्शी नेतृत्व, असामान्य कर्तृत्व आणि अद्भुत नेटवर्किंग यांचीही मार्मिक उकल केली आहे. राजांची चाकोरीबाहेरचा विचार करण्याची वृत्ती (आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग) आणि जोखीम पत्करण्याची क्षमता (रिस्क टेकिंग अॅबिलिटी) याचाही लेखकाने विशेष परामर्श घेतला आहे. महाराजांचे माणसे पारखण्याचे कौशल्य तसेच विपरीत काळातही संतुलन व मनोबल राखण्याचे धैर्य, यांसारख्या त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचे दर्शन या पुस्तकातून घडते. शिवाजीराजांची राजनीती, युद्धनीती व अर्थनीती तद्वतच, त्यांची स्वराज्यसंकल्पना व परराष्ट्रधोरण यांचा डॉ. सुमंत टेकाडे यांनी 'नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ 'युगंधर शिवराय'मधून कालोचित वेध घेतला आहे. शिवरायांच्या गुणविशेषांची आजच्या काळाशी लेखकाने घातलेली सांगड अत्यंत उद्बोधक आहे. त्यामुळे हे पुस्तक विविध क्षेत्रांतील कार्यरत व्यक्ती, विद्यार्थी आणि संस्थांसाठीही प्रेरक आणि मार्गदर्शक झाले आहे. प्रत्येक शिवप्रेमींनी जवळ बाळगावे, असेच हे पुस्तक आहे.
Share
