Collection: Meena Prabhu

मीना प्रभू  - Meena Prabhu Books Buy Online at akshargranth website | 

डॉ. मीना सुधाकर प्रभू या एक डॉक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण पुणे शहरात झाले. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डी.जी.ओ. झाल्या. १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडमध्ये आल्या. त्यांनी सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.

प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या आर्किटेक्ट पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले.