Collection: Ranjit Desai Collection

रणजित देसाई - Ranjit Desai Books Buy Online | 

रणजित रामचंद्र देसाई (जन्म : ८ एप्रिल १९२८; - ६ मार्च १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.

रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित 'नाच गं घुमा' हे आत्मचरित्र अतिशय गाजले.