Skip to product information
1 of 1

Akshargranth

सामी – पेरुमल मुरुगन, अनुवाद : श्वेता प्रधान Samee by Perumal, Shweta Pradhan

सामी – पेरुमल मुरुगन, अनुवाद : श्वेता प्रधान Samee by Perumal, Shweta Pradhan

Regular price Rs. 335.00
Regular price Rs. 375.00 Sale price Rs. 335.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

सामी – पेरुमल मुरुगन, अनुवाद : श्वेता प्रधान

Samee सामी

लहानपणी ऐकलेली ‘आजीची गोष्ट’ आठवते? व्यक्तिरेखांसह तो काळ, स्वभाव, सवयी, जीवनपद्धती, आचरण, शिकवण यांचे कळत-नकळत संस्कार करण्याची क्षमता त्या गोष्टींमध्ये होती. पेरुमल मुरुगन यांच्या ‘सामी’ मध्ये अशीच क्षमता आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका दक्षिण भारतीय शेतकऱ्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षाची ही गोष्ट. तामिळ संस्कृतीच्या गोडव्यासह लोकरीची गुंडाळी सोडवावी तशी मुरुगन यांच्या लेखणीतून कथा हळुवार उलगडत जाते. एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकण्याइतकी रक्ताची नाती, पोटच्या पोरांशी जोडलेली नाळ कमकुवत असते का? प्रस्थापित समाजव्यवस्था आणि एकत्र कुटुंबसंस्थेला मुरुगन यांच्या ‘सामी’ या कादंबरीने असेच काही प्रश्न विचारले आहेत.
तामिळ भाषेत सामी म्हणजे श्रेष्ठ मालक. कादंबरीतल्या मुथ्थूसामीसोबत वाचक एका नव्या जमिनीच्या शोधात निघतो. सेतूर आणि कोरडूसारखी गावं ओलांडून पलीकडे जाताना नाचणीची शेतं, कडुलिंबाचे वृक्ष आणि चिंचेची झाडं दाट छाया धरतात. पंगुणी महिन्यातली रिमझिम आणि सित्तिरईचा कडक उन्हाळा सोसत बाजरी नाहीतर नाचणीच्या ‘कळी’मध्ये कुस्करलेल्या वालपापडीच्या बियांची झणझणीत चव चाखत हा प्रवास रंजक होतो.
कादंबरीचा काळ जुना असला तरी मनुष्यस्वभाव आजही तसाच आहे, त्यामुळे संदर्भ कालबाह्य ठरत नाही. पहिल्या पानावरचा वाचक शेवटचं पान पलटताना एक विद्यार्थी होऊन जीवनानुभवाचं गाठोडं सोबत घेऊन जातो. पण मुथ्थूचं काय? स्वतः सह त्याच्या कुटुंबियांचं आयुष्य पणाला लागलंय. आपण ‘सामी’ असल्याचं तो कसं सिद्ध करेल?

View full details