Akshargranth
सोन्याची शाळा - डॉ. सुधीर रा. देवरे, Sonyachi Shala by Dr Sudhir R Devare
सोन्याची शाळा - डॉ. सुधीर रा. देवरे, Sonyachi Shala by Dr Sudhir R Devare
Couldn't load pickup availability
सोन्याची शाळा - डॉ. सुधीर रा. देवरे, Sonyachi Shala by Dr Sudhir R Devare
‘सोन्याची शाळा’ हा साहित्यातील अभिनव प्रयोग आहे. तो एका बाजूला साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ची आठवण करून देतो, तर दुसऱ्या बाजूला भाषांच्या बहुलतेची. सुधीर देवरे नेहमीच भाषा आणि साहित्य ह्या दोन्ही विश्वात सतत आघाडीवर राहून काम करत आले आहेत. साहित्यविश्वात ‘सोन्याची शाळा’ कायम आठवणीत राहील असे नॅरेटिव्ह देवरेंनी कुशलतेने उभे केले आहे.
‘सोन्याची शाळा’ या कादंबरीत डॉ. सुधीर रा. देवरे यांनी सोन्या नावाच्या एका ग्रामीण मुलाची शाळा चितारली असून आपल्या वास्तव शाळेच्या संकल्पनेसोबत घरात, गल्लीत, गावात, शिवारात आणि मित्रांसोबत शाळेबाहेर तो एक स्वतंत्र शाळाच शिकत असल्याने त्याचे भावविश्व विस्तारत जाताना दाखवले आहे. खरे शिक्षण म्हणजे अनुभूती आणि अनुभव. हे अनुभव कादंबरीतला सोन्या आपल्या सहलींतून, परिश्रमांतून, खेळांतून, बाजारातून घेत आपल्या सर्वच क्षेत्रांतल्या शिकण्याच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावत राहतो. यात कुठल्याच प्रकारचे लादलेले शिक्षण नसून तो सर्व हौसेने शिकत राहतो. अहिराणी बोली आणि प्रमाणभाषा यांच्या सुरेख संगमातून आपण सोन्याच्या शाळेत दाखल होतो.
ही कादंबरी सजग-प्रगल्भ वाचकांना आपल्या बालविश्वात खेचून नेईल
आणि विद्यार्थीदशेत असणाऱ्या सर्वच कुमार- युवकांनाही नक्कीच आवडेल.
– गणेश देवी
Lokvangmay Grih |
Share
