Akshargranth
51 Bodhapar Goshti ५१ बोधपर गोष्टी by डॉ. सुधा खराटे
51 Bodhapar Goshti ५१ बोधपर गोष्टी by डॉ. सुधा खराटे
Couldn't load pickup availability
51 Bodhapar Goshti ५१ बोधपर गोष्टी by डॉ. सुधा खराटे
आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यानं खूप मोठं व्हावं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं; पण प्रत्यक्षात या प्रक्रियेत अनेक समस्या, अडचणी येतात. मूल जसजसं मोठं होत जातं तसतसं त्याचं वागणं आपल्याला समजणं अवघड जातं आणि आपलं म्हणणं त्याला या वयात प्रेमानं कसं समजावून सांगावंहेदेखील कळत नाही. अशा वेळी गरज असते ती मुलांवर योग्य संस्कारांची आणि मार्गदर्शनाची. त्यासाठी मुलांची वाचनाची आवड जोपासण्याकडे पालकांनी डोळसपणे बघून त्यांच्या हाती संस्कारक्षम साहित्य देणं गरजेचं असते. बोधपर आणि रंजक गोष्टींमुळे मुलांचा भावनिक, बौद्धिक आणि नैतिक विकास तर होतोच; शिवाय मुलांची कल्पनाशक्तीही वाढते. म्हणून आम्ही मनोरंजक, बोधपर, कथांचा संग्रह खास छोट्या दोस्तांसाठी घेऊन आलो आहोत.
जीवनाचे सार सांगणाऱ्या आणि मुलांना नीतिमूल्यांची शिकवण देणाऱ्या गोष्टींचा खजिना या संग्रहात आहे. कथेच्या शेवटी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा संदेश दिलेला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या बोधकथांचे वाचन उत्तम संस्कारांचे काम करू शकते. मुलांचं मनोरंजन करतानाच त्यांना सुज्ञ व चौकस बनवण्यासाठी या बोधपर संस्कारकथा आवर्जून वाचायला हव्यात.
Share
