Skip to product information
1 of 1

Akshargranth

A Great Leveller Marathi Edition by R. Sucharit (Author)

A Great Leveller Marathi Edition by R. Sucharit (Author)

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

A Great Leveller Marathi Edition by R. Sucharit (Author) - Shrividya Prakashan

भूकंपग्रस्त भागाचे फोटो व चित्रफिती तर इतक्या भयानक होत्या की त्यांनी देशाला हादरवून टाकले, कोणतीही घटना इतकी भयानक आणि दुःखद नव्हती. मृत्यूचे इतके प्रकांड, प्रचंड तांडव या आधी कोणीही पाहिले नव्हते, ज्या प्रकारे भूजमध्ये झाले होते. पूर्ण कुटुंबेची कुटुंबे काही सेकंदात नष्ट झाली होती. जिकडे पाहा तिकडे गाव विखुरलेले दिसत होते. गिधाडे, कावळे घिरट्या घालीत मृत देहांचे लचके तोडीत होते. या कठोर नैसर्गिक घटनेने जनजीवन हादरले होते. जखमी लोकं, आपल्या जखमा विसरून, चिंध्या झालेल्या कपड्यांमध्ये सैरावैरा आपल्या प्रिय जनांंना शोधित होते. लहान मुले बायका, वेदनांनी कण्हत होते. तरुण पुरुष आपल्या जखमा विसरून इतरांची मदत करीत होते. दुःख, आत्यंतिक भीती, समोर ठाकलेले मरण, त्यांनी मानवाला एका असहाय्य स्थितीपर्यंत पोचवले होते. सर्वांत शब्दात न मांडता येणारे दारूण दृश्य म्हणजे अगतिक होऊन अश्रू ढाळणारी माणसे, अति दुःखाने कण्हत राहणार्या स्त्रिया, त्यांचा भूतकाळ व वर्तमानकाळ नष्ट झालेला त्यांना दिसत होता. त्यांचे प्रियजन दगड-विटांच्या ढिगार्यातून बाहेर काढले जात होते. या सर्वांचे दुःख भविष्यकाळात आयुष्यभर त्यांना ओझ्याप्रमाणे वाहावे लागणार होते. त्यांचे ईश्वराला विनवणी करणारे डोळे, भयभीत होऊन इकडे-तिकडे पाहत होते. ते दृश्यच असे होते की कितीही कणखर मनाचा पुरुषदेखील गुढघे टेकवून नियतीला शरण जाईल. दगड-विटा, कोसळलेले बांधकाम सर्व गोळा करून नवीन रस्ते व घरे बांधण्याचे काम, अनेक महिने काम, अनेक वर्षे चालणार होते. परंतु लोकांच्या हरविलेल्या आशा, लोपलेली स्वप्ने, त्यांचे काय? भविष्यात कधीही ती स्वप्ने पूर्ण होणार नव्हती. हजारो लोकांची स्वप्ने तुटलेल्या मालिकेप्रमाणे, त्यांच्या शत-विशत देहाबरोबर नष्ट झाली होती. नियतीने त्यांना दिलेला हा एक भयंकर झटका होता.
काही लोकांना वाटत होते हा सैतानाने दिलेला शाप आहे, पण ही पापकर्मांची सजा होती की काय! अंधश्रद्धाळू लोक आकाशाकडे पाहून प्रार्थना करीत होते, क्षमा मागत होते.
पण एक नक्की होते की, हा दिवस इतिहासातील अभूतपूर्व दिवस........ लवकरच हे पुस्तक वाचकांपर्यंत पोचत आहे ,
अतिशय उत्कंठावर्धक रहस्य उलगडून दाखविणारे हे पुस्तक फक्त श्रीविद्या

Shrividya Prakashan |

View full details