Akshargranth
Aagishi Khelatana by Ramshila, Reshma Ansari, Kavita Mahajan
Aagishi Khelatana by Ramshila, Reshma Ansari, Kavita Mahajan
Couldn't load pickup availability
Aagishi Khelatana Saat Stree Karykartyancha Sahpravas - Translator - Kavita Mahajan आगीशी खेळताना सात स्त्री कार्यकर्त्यांचा सहप्रवास by रामशीला , रेश्मा अन्सारी , रुचा नागर , रुचा सिंह , शशी वैश्य , शशिबाला , स्वरबाला
जगातील गरीब 'याचक स्त्रिया' असे विकासविषयक देवाण-घेवाणीत दोन वर्ग असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखन-संशोधन-निर्मितीच्या सहभागी प्रक्रियेत स्त्री-अभ्यास क्षेत्रातील एक ख्यातनाम अभ्यासक त्यांची संगतिन म्हणजे साथीदार झाली. त्यातून अकादेमिक क्षेत्र आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे जग यांच्या परस्पर संबंधातल्या ताण-तणावांबद्दलही मोकळेपणी चर्चा झाली. या भावनिक-वैचारिक-आंदोलनात्मक संघर्षमय प्रवासाची ही खिळवून टाकणारी बखर 'स्त्रीमुक्ती' च्या स्वयंसेवी संस्थांच्या पर्वातल्या राजकारणामागचा गुंता समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल यात शंका नाही.
या कहाण्यांतून या स्त्रियांनी केलेल्या चर्चातून 'आम्ही अबला तर नाहीच, पण अडाणी विचारशून्य याचकही नाही' हा विचार पुन्हा पुन्हा स्पष्टपणे पुढे येतो. आज फुले, अविडकर आणि स्त्री आंदोलनांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात एकाकडे आंदोलनात काहीसा ठहराव दिसतो, तर दुसरीकडे शासन दरबारी व अकादमिक पातळीवर स्त्रीमुक्ती किंवा सवलीकरण हे परवलीचे शब्द अनेक प्राणहीन कर्मकांडात वापरले जात आहेत. अशा वेळी या पुस्तकाच्या निमित्ताने काही नव्या चर्चा घडतील अशी खात्री आहे.
Ramshila, Reshma Ansari | Kavita Mahajan | Manovikas Prakashan |
Share
