Skip to product information
1 of 1

Akshargranth

Aagla Wegla आगळं-वेगळं by S G Malashe, स.गं. मालशे

Aagla Wegla आगळं-वेगळं by S G Malashe, स.गं. मालशे

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 375.00 Sale price Rs. 340.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Aagla Wegla आगळं-वेगळं by S G Malashe, स.गं. मालशे

सिसिरोसारखे थोर लोक शिळोप्याचा वेळ तत्वज्ञानाचे गंभीर ग्रंथ वाचण्यात व्यतीत करीत; तर सर्वसाधारण वाचकवर्ग ही कथा-कादंबऱ्यांचा चहाता असतो. याशिवाय अधल्यामधल्या तुमच्याआमच्यासारख्यांना वाचनासाठी काही 'आगळं-वेगळं' हवं असतं. समजा, -एखादा माणूस घराच्या छपरावर उभे राहून आपण कसे नि किती भांडतो, हे साग्रसंगीत सांगू लागला;- -एखादा इटालियन पाद्री आपण 'रोमन ब्राम्हण' असून हिंदूंचा हरवलेला पाचवा वेद घेऊन आलो आहो, असा पुकारा करू लागला;- -कोणी एक जैन ग्रंथकार इरसाल ठककथांशी हिंदू पुराणकथांची उलटी सांगड घालून त्यांचा लटकेपणा उघड करू लागला;- -कोणी एक व्युत्पत्तिपटू 'जॉन'चे मूळ 'जनू'त आणि 'हनिमून'चे मूळ 'हनुमाना'त शोधून 'कृण्वन्तो विश्वमार्यम' हे तत्व जादा ताणू लागला;- -कृष्ण आणि ख्रिस्त यांच्या कथांत साम्य शोधणारी ख्रिस्ती मंडळी आहेत; पण उर्दू आणि मोडी लिप्यांची वळणे लगामी लावून एखादा मुस्लिम प्रचारक महंमद आणि कलंकी अवतारांतील निष्कलंक साम्यशोधन करताना आढळला;- -तद्वतच, जुन्या प्रवासातील पेचप्रसंग, अपशब्दांचे वर्गीकरण, लेखनपद्धतीतील चातुर्वण्य आणि 'पठाणक्लबा'तील 'गोस्वामी मानवप्रकाशम' यांनी मराठी साहित्यात फुंकलेला 'पांचजन्य' यांची सुरस आणि चमत्कारिक माहिती मिळाली तर- डॉ. स. ग मालशे यांचे हे पुस्तक याहून काय 'आगळं-वेगळं' आहे?

S G Malashe | Papyrus Prakashan | Latest Edition | Marathi | Hardbound | Pages 173 |

View full details