Akshargranth
Aarogyasevetil Digital Ani AI Kranti आरोग्यसेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती
Aarogyasevetil Digital Ani AI Kranti आरोग्यसेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती
Couldn't load pickup availability
Aarogyasevetil Digital Ani AI Kranti आरोग्यसेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती by डॉ. अविनाश भोंडवे | डॉ. दीपक शिकारपूर
डिजिटल तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्राचे भविष्य यांच्यातील क्रांतिकारी समन्वयांचा शोध लेखकद्वयीने या पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकातील प्रवासात युयुत्सु वाचकांची वैद्यकीय शास्त्रातील उल्लेखनीय प्रगतीशी ओळख होईल. रोगनिदान, उपचार आणि एकूणच आरोग्यसेवेच्या पद्धतीत डिजिटल तंत्रज्ञानामुळे बदल घडतो आहे. हे नवे तंत्रज्ञान रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी आणि डॉक्टर्स, तसेच इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांना नवी क्षितिजे उपलब्ध करून अधिकाधिक कार्यक्षम बनवते आहे. डिजिटल क्रांती हा आरोग्यसेवा क्षेत्रात होणारा एक क्रांतिकारी बदल आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्यसेवा अधिक कार्यक्षम, प्रभावी आणि सुलभ बनवण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक तपासण्या आणि इतर सेवा या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने कमी वेळेत, वाजवी दरांत आणि अधिक परिणामकारक व सोयीस्कर पद्धतीने पोहोचविणे शक्य होणार आहे. पुढील दोन-अडीच वर्षांत डिजिटल आरोग्यसेवांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.
Dr Avinash Bhondve | Dr Dipak Shikarpur | Vishwakarma Publications | Latest New Edition | Marathi | Paperback | Pages 220 |
Share
