Akshargranth
Akher Sapadli Vaat by Eknath Avhad
Akher Sapadli Vaat by Eknath Avhad
Couldn't load pickup availability
Akher Sapadli Vaat by Eknath Avhad अखेर सापडली वाट - एकनाथ आव्हाड
कठीण परिस्थितीतही मार्ग निघतो, काढता येतो; असा विश्वास बालवाचकांना देणाऱ्या एकनाथ आव्हाड यांच्या कथा
मोठ्यांसह लहान मुलांवरही सध्या माहितीचा प्रचंड भडिमार होतो आहे. आपल्याकडे येणाऱ्या माहितीमधलं काय घ्यायचे, काय नाही याचा विचार करायलाही कुणालाच उसंत मिळत नाही. त्याचबरोबर मुलांनी काय बघावे, वाचावे, ऐकावे, यावर ताबा ठेवणे शिक्षक किंवा पालक यांच्या हातात राहिले नाही. त्यामुळे कित्येकदा नको ती माहिती, जगभरात विविध देशात चालू असलेली युद्धजन्य परिस्थिती हे सगळंच मुलांच्या कानांवर पडत आहे. हे चित्र पाहत असताना मुलांच्या मनात भीती उभी राहू शकते किंवा वास्तवाची जाणीव त्यांना अस्वस्थ करू शकते.
अशा वेळी, आशावादी कथा त्यांना दिलासा देऊ शकतात. अर्थात त्यामध्ये वास्तवाचा अंतर्भाव असायलाच हवा. कारण मुलं वास्तव पाहतात, ऐकतात, अनुभवतात. अशा कठीण परिस्थितीतही मार्ग निघतो, काढता येतो; असा विश्वास बालवाचकांना देणाऱ्या एकनाथ आव्हाड यांच्या या कथा आहेत. त्यामध्ये कुठेही खिन्न, विषण्ण असा सूर नाही. तो प्रयत्नवादी, आशावादी आहे.
Sakal Prakashan |
Share
