Akshargranth
Anna Bhau Sathe Samagra Vadmay Part 1 by Anna Bhau Sathe
Anna Bhau Sathe Samagra Vadmay Part 1 by Anna Bhau Sathe
दहा कादंबऱ्या.आघात,फकिरा,आग,चित्रा,आवडी,माकडीचा माळ,रानबोका,संघर्ष,वैजयंता,वारणेच्या खोऱ्यात.
लोकसाहित्य अण्णा भाऊ साठे समग्र वाड्मय अण्णा भाऊंच्या लेखनाविषयी सांगणे म्हणजे हदयाच्या ठोक्यांना हदयाबद्दल सांगण्यासारखेच आहे. द-याखो-यातून,कडेकपारीतून क्षितीजाशी टक्कर देणा-या बेलगाम घोडयावर स्वार होण्यासारखं आहे. त्यांच्या कथेत, कादंबरीत, वगनाटयात, पोवाडयात शिरताना शहारणे, अश्रूंचे घळाघळा वाहणे, डोळयांच्या छटा लाल होणे, एखादया नाजूक वर्णनाने हदयात धडधडणे, कामगाराच्या कष्टाचा घाम जवळचा वाटणे हे स्वाभाविकच असतं. हा सगळा अनुभव हा जीवनाचं सार्थक वाटणारा असतो. अनुभवालाही अनुभूती दाखवणारं लिखाण हे अण्णा भाउंचं खास वैशिष्टय. या निराधार जगात मारण्याचा मोह न करता त्यांनी जगण्याचे श्वास शोधले. आणि सगळयांसाठी ते प्रत्येक शब्दांतून राखून ठेवले. त्यांचे एकेक शब्द म्हणजे हजारो, लाखो श्वास आहेत.