Akshargranth
Antim Granth by Zoran Zivkovic अंतिम ग्रंथ - झोरान झिवकोविच, भाषांतर - आदूबाळ
Antim Granth by Zoran Zivkovic अंतिम ग्रंथ - झोरान झिवकोविच, भाषांतर - आदूबाळ
Couldn't load pickup availability
अंतिम ग्रंथ - झोरान झिवकोविच, भाषांतर - आदूबाळ
एका ओल्याचिंब सकाळी एका जुन्या पुस्तकदुकानात एक दुर्मीळ ग्रंथ आढळतो आणि त्याच्यासोबत पुढे येतं एक कोडं. जणू त्या गूढ ग्रंथाच्या रूपरेषेला अनुसरत सलग मृत्यूंची मालिका सुरू होते. पोलीस इन्स्पेक्टर देजान लुकीच एका भूलभुलैय्यात खेचला जातो. दुकानाची आकर्षक मालकीण वेरा गॅव्ह्रिलोविचसोबत त्याच्या लक्षात येतं, की बळींमध्ये फक्त एकच साम्य आहे, ते म्हणजे मृत्यूपूर्वीच्या क्षणी ते एक मायावी, अज्ञात पुस्तक वाचत होते - अंतिम ग्रंथ !
'बिब्लिओमिस्ट्री' चा.१ उस्ताद समजला जाणारा झोरान झिवकोविच आपल्या स्फटिकासारख्या नितळ, पण मितव्ययी शैलीत ही अद्भुतकथा मांडतो. इथे वाचनाची कृतीच प्राणांतिक धोक्याचं - पण त्याचबरोबर मोहमयी आनंदाचं कारण ठरते. 'अंतिम ग्रंथ' हे जुन्या पुस्तकांच्या दुकानांना लिहिलेलं प्रेमपत्र आहे, आणि जिज्ञासूंना दिलेला इशाराही : शेवटचं पान तुम्ही समजताय त्यापेक्षा खूपच जवळ आहे !
Zoran Zivkovic | Walden Publication |
Share
