Skip to product information
1 of 1

Akshargranth

Arsad By Vyankatesh Solanke अरसड - व्यंकटेश सोळंके

Arsad By Vyankatesh Solanke अरसड - व्यंकटेश सोळंके

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’ ही कादंबरी मनी नावाच्या एका उपेक्षित कृषिकन्येच्या दुःखभोगाचा आणि सावत्रपणामुळे परित्यक्ता आईसोबत माया नसलेल्या आजोळी उपेक्षा आणि वंचनेचा धनी ठरलेल्या रमनाच्या करपलेल्या बालपणाचा करुण व्याकूळपट आहे. मानवी नातेसंबंधांमधून आकाराला येणारे अनेकमुखी विद्रूप असे राजकारण या कादंबरीचा गाभा आहे. विक्षिप्त, स्वार्थी आणि निष्ठुर अशी स्वभावचित्रे इथे रेखाटलेली आहेत. चक्रम, सूर्याजी, यादव, गंगनबाई, मारती ह्या पात्रांच्या माध्यमातून व्यंकटेश सोळंके यांनी उभा केलेला कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचा गुंता मानवी नातेसंबंधांतील पोकळ, खिळखिळ्या धारणेला भेदकपणे अधोरेखित करतो. श्रद्धा, लोकविधी, प्रथा, परंपरा, धारणा आणि विविध चालीरीतींतून प्रसवणारं समाजमन आणि त्यात गुंतत गेलेली, मुक्तीच्या वाटा विसरलेली गेल्या अर्धशतकातली पिढी ‘अरसड’ मध्ये पायात ठसठसणाऱ्या काट्यासारखी खुपत राहते. वेदनेचे अपार करुण असे समाजसंदर्भ त्यांच्या चरित्राला बिलगलेले आहेत. मराठवाडी, विशेषतः नांदेडी ग्रामीण बोलीभाषेचा उत्कृष्ट नमुना या कादंबरीत सशक्तपणे आविष्कृत झालेला आहे. आई-मुलाच्या नात्यातील हृदय हेलावून टाकणाऱ्या अभावग्रस्ततेचं शोकात्म चित्रण या कादंबरीत आहे. पडीक अरसडासारखी रमना आणि मनीच्या आयुष्याची स्थिती असली, तरीही या उजाड, उदासवाण्या स्थितीतही पडीक नि खुरटं झालेलं ‘अरसड’ कधी तरी फुलेल आणि त्याचे सदाहरित उपवनात रूपांतर होईल अशी दुर्दम्य आस त्यांना आहे, हे या कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

View full details